अहमदनगर -सुथो-
अहमदनगर शहराच्या लगत असणाऱ्या केडगाव आणि नगर तालुक्यातील वाटेफळ येथे अवैध बायोडिझेल विक्री होत होती. या ठिकानी पुरवठा विभागाने छापे टाकून कारवाई केली या छाप्या नंतर पोलीस तपासात मोठं मोठे उद्योगपती आणि राजकीय पुढाऱ्यांच्या समावेश आढळून आला.या प्रकरणात सरकारचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडल्याची माहिती आता समोर येतसूथो असून बायोडिझेल च्या माध्यमातून कोटी रुपयांची उलाढाल होत असल्याचं पोलीस तपासत समोर येत आहे या प्रकरणाची सरकारने गंभीर दखल घेतली असून सरकारचा महसूल बुडवणारऱ्या या अवैध बायोडिझेल विक्री वर कडक निर्बंध घालण्याचा सूचना संबंधित खात्यांना देण्यात आला आहे.तर नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी जी शेखर यांनी या बाबत आदेश काढलेसूथोआहेत सर्व पोलीस ठाण्याच्या पोलीस निकरीक्षकांनी आपल्या हद्दीत अवैद्य बायोडिझेल विक्री सुरू असेल तर ती त्वरित छापे टाकून कारवाई करून बंद करावी तसेच आपल्या पोलीस स्टेशन च्या हद्दीत अवैद्य बायोडिझेल विक्री होत नसल्याचं पत्र पोलीस अधीक्षकांना सादर करावे जर एखाद्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध बायोडिझेल विक्री होत असेल आणि विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या पथकाने छाप टाकला तर संबंधित पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी याला जबाबदार राहील त्या मुळे आपल्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत बायोडिझेल विक्री होत नाही असे पत्र १ डिसेंबर पर्यंत सर्व पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी पत्र सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत