अहमदनगर दि.२ जानेवारी
नगर तालुक्यातील खारेकर्जुने येथील दलित कुटुंबीयांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कडे निवेदना द्वारे सामूहिक आत्महत्या करण्याची परवानगी मागितल्याने एकच खळबळ उडाली आहे.
संजय शाहू बोरुडे यांनी हे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे. संजय बोरुडे यांची वडिलोपार्जित शेत जमीन खारेकार्जुने येथे असून या शेत जमिनीत राजकीय पुढारी अतिक्रमण करत असल्याचा बोरुडे यांचा आरोप आहे. या शेतातून नागपूर ते भाळवणी हा रस्ता करण्यात आला तसेच एका शाळेने संजय बोरुडे यांच्या शेतात अतिक्रमण करून बांधकाम केले आहे. या बाबत बोरुडे यांनी न्यायालयात दाद मागितली आहे मात्र न्यायालयाच्या निकालाच्या प्रतीक्षेत असताना गावातील राजकिय पुढारी पुन्हा शेत जमिनिवर अतिक्रमण करत पुन्हा चौडी रस्ता करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप बोरुडे यांनी केला आहे.
या कामा बाबत तहसीलदारांनी अधिसूचना काढताना जागा मालक असूनही कामसंबंधी कोणतीच नोटीस दिली नसल्याने हे काम बेकायदेशीर असल्याचं बोरुडे यांनी नमूद केले आहे. बोरुडे यांच्या कुटुंबीयांचा जीवन जगण्याचे साधन हे शेत जमीन असून ती जमीन दिली तर जवळजवळ 20 ते 22 कुटुंबातील सदस्य रस्त्यावर येण्याची शक्यता असल्याने बोरुडे कुटुंबीय हवालदिल झाले आहेत.
जर काम थांबवायचा प्रयत्न केला तर राजकीय पुढारी बुरुडे कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देत असल्याचेही या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याबाबत पोलिस प्रशासनाकडे आणि महसूल प्रशासनाकडे तक्रार करूनही त्यांनी पुढाऱ्यांना सोडून बोरुडे कुटुंबियांना त्रास देत आहेत जर पोलिस प्रशासन महसूल विभाग व महसूल मंत्री जर मला न्याय मिळून देत नसतील तर आम्हाला आत्महत्यास परवानगी द्यावी किंवा बोरुडे कुटुंबियांच्या मालकीच्या गट क्रं.33 चा पश्चिमेकडील बांध हद्द कायम करुन द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनावर संजय बोरुडे यांच्या सह शाहु नाना बोरुडे,संजय शाहु बोरुडे ,दिपक शाहु बोरुडे, सतीष शाहु बोरुडे,मनिषा संजय बोरुडे,ज्योती दिपक बोरुडे ज्योस्ना सतिष बोरुडे,सुंदरबाई इंदर नयन,विनोद भिमराज बोरुडे,सुवर्णा विनोद बोरुडे,विजय भिमराज बोरुडे ,रानी विजय बोरुडे,रंजना भिमराज बोरुडे,शांताबाई भिमराज बोरुडे,पायल संजय बोरुडे,श्वेता संजय बोरुडे,मनस्वी संजय बोरुडे,निखील दिपक बोरुडे,अखिल दिपक बोरुडे,सेजल सतीष बोरुडे,हर्षद सतिष बोरुडे या सदस्यांच्या साडे असून या सर्वांनी आत्महत्या परवानगी मागितली आहे.