अहमदनगर दि ६ मार्च
बारामतीच्या खासदार सुप्रियाताई सुळे या अहमदनगर मध्ये एक कार्यक्रमा निमित्त नगर शहारत आल्या असताना कार्यक्रमाला उशीर आहे हे समजल्या नंतर त्यांनी अहमदनगर शहरातील भुईकोट किल्ला पाहण्याची इच्छा व्यक्त केली होती त्यावेळी आमदार संग्राम जगताप तसेच अभिजित खोसे आणि संजीव भोर यांच्यासमवेत खासदार सुप्रियाताई सुळे यांनी भुईकोट किल्ल्याची छोटीशी सफर केली.
या दरम्यान आमदार संग्राम जगताप यांनी हा भुईकोट किल्ला नगर शहराची शान असून सध्या लष्कराची काही कार्यालये या ठिकाणी असल्याने भुईकोट किल्ला फक्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी या दिवशी सामान्य नागरिकांना पाहण्यासाठी खुला असतो त्यामुळे येथे मोठी गर्दी होती त्यासाठी आपण दिल्लीमधून प्रयत्न करून हा किल्ला महिन्यातून किमान दोन वेळेस इतर नागरिकांसाठी खुला करण्यात यावा अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांनी केली.
तसेच या किल्ल्याच्या आजूबाजूला सुशोभीकरण केले तर एक मोठे पर्यटन स्थळ त्याठिकाणी होऊ शकते आणि नगर शहराला पर्यटनाच्या दृष्टीने हा किल्ला खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे आपण स्वतः लक्ष घालावे अशी मागणी केली होती.
सुप्रियाताई सुळे यांनी किल्ल्याच्याबाहेर येताच फेसबुकवर लाईव्ह करत या किल्ल्याबाबत आपण लवकरात लवकर निर्णय घेऊ आणि आपल्या मुलांसाठी हा किल्ला खुला होईल अशी ग्वाही आमदार संग्राम जगताप यांना दिली आहे आजा सुप्रियाताई सुळे यांची ही छोटीशी धावती भेट नगर शहराला महत्वपूर्ण ठरणार आहे.
पहा व्हिडीओ