अहमदनगर प्रतिनिधी
अहमदनगर जिल्हा रुग्णालयात६ नोव्हेंबर रोजी आगीची मोठी घटना घडली होती ज्या ठिकाणी ही आग लागली त्या covid-19 कोविडं कक्षात एकूण १७ पेशंट उपचार घेत होते त्यापैकी ११ रुग्णांचा आगीमध्ये भाजून आणि गुदमरून मृत्यू झाला यापैकी जे रुग्ण वाचले होते त्यांना काही खाजगी दवाखान्यांमध्ये उपचारासाठी दाखल केले होते.रुग्ण दाखल केल्यानंतर रुग्णांना फक्त icu उपलब्ध करून देण्यात आला तर रुग्णांना औषधे रुग्णांच्या नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयातून आणून दिले तर काही रुग्णांच्या पांढऱ्या पेशी कमी झाल्याने त्याचा खर्च रुग्णांच्या नातेवाईकांनी आपले दागिने मोडून खर्च केला अशी माहिती रुग्णांच्या नातेवाईकांनी दिली जेव्हापासून त्यांना रुग्णालयात दाखल केलं त्या वेळेपासून अद्यापपर्यंत कुणीही सरकारी अधिकारी किंवा राजकीय व्यक्ती भेटण्यासाठी अथवा विचारपूस करण्यासाठी आलेला नाही आणि कोणतीही आर्थिक मदत मिळाली नाही या घटनेला दहा दिवस उलटून गेले आहेत मात्र अद्यापही काही पेशंटची प्रकृती सुधारत सुधारलेली नाही मात्र आता रुग्णालय प्रशासनाने तुमचा पेशंट तुमच्या जबाबदारी वर घरी घेऊन जा अथवा पुढील उपचारासाठी तुम्हाला पैसे भरावे लागतील असे रुग्णाच्या नातेवाईकांना सांगितल्यामुळे त्यांच्या समोर एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे गरीबी मुळे जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते मात्र आगीमुळे पुन्हा खाजगी दवाखान्यात यावे लागले मात्र आता इथे आम्हाला कुणी वाली नसल्याची खंत रूग्णाच्या नातेवाईकांनी बोलून दाखवली