अहमदनगर दि.१० फेब्रुवारी
नगर शहरातील गुलमोहर रोड येथील अर्बन बँक कॉलनी मध्ये असणाऱ्या श्री हौशी विठोबा मंदिराचा रौप्य महोत्सव सोहळा १५ फेब्रुवारी रोजी ह.भ.प. प.पू. भक्तराज महाराज(श्री उध्दव महाराज, संस्थान श्री क्षेत्र मुल्हेर) यांच्या पवित्र सानिध्यात तसेच अहमदनगर जिल्ह्याचे खासदार सुजय विखे पाटील शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये साजरा करण्यात येणार आहे.
अशी माहिती आदिनाथ भगवान जोशी प्रज्ञा व अभिजीत आदिनाथ जोशी, आश्विनी व राजेश यशवंत अध्यापक यांनी दिली आहे.
४ फेब्रुवारी पासून मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम सुरू असून काकड आरती श्री गणेश जयंती सोहळा,हरिपाठ,श्री. ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा
असे कार्यक्रम रोज होत असून १४ फेब्रुवारी रोजी सकाळी ६.०० वा.सकाळी ८.३० वा. – श्री महाविष्णूयाग प्रारंभ,दुपारी १२.३० वा. – महाआरती संध्या. ६.०० वा.भजन आरती होणार असून१५ फेब्रुवारी २०२२ पहाटे ३.३० वा.काकड आरती पहाटे ४.०० वा. महापूजा पहाटे ६.०० वा. महाआरती सकाळी ८.३० वा. – महाविष्णूयाग प्रारंभ होणार आहे तर सकाळी ११.३० वा. श्री. ह.भ.प. प. पू. भक्तराज महाराज यांच्या हस्ते पूर्णाहूती व श्री विठ्ठलाची महाआरती होणार आहे.
त्या नंतर ह.भ.प. भक्तराज महाराज यांची पाद्यपूजा, सत्कार केल्या नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे तरी सर्व भाविकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन श्री हौशी विठोबा मंदिर ट्रस्टी तर्फे करण्यात आले आहे.