Homeक्राईमगोवा राज्यातून आणलेली अकरा लाखांची विदेशी दारू बनावट लेबल राज्य उत्पादन शुल्क...

गोवा राज्यातून आणलेली अकरा लाखांची विदेशी दारू बनावट लेबल राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जप्त घोडेगाव येथे मोठी कारवाई

advertisement

अहमदनगर दि.३ मार्च
महाराष्ट्रात राज्यात प्रतिबंधीत असलेला गोवा राज्यातील 11 लाख 21 हजार 730 रुपये किमतीचा विदेशी मद्याचा साठा व बनावट लेबल्स राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अहमदनगर कार्यालयातर्फे आज जप्त करण्यात आला. नगर औरंगाबाद रोड वरील घोडेगाव येथे गोवा राज्यातून विदेशी दारू आणून त्या बाटल्यावरील लेबल बदलून ती दारू विविध हॉटेल मध्ये विक्री केली जात असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती.

घोडेगाव येथील सर्व माहिती घेऊन राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकून दामू पुंजाराम जाधव अंदाजे (वय 42 वर्ष ) व रामू पुंजाराम जाधव( वय 45, )राहणार भैरवनाथ मंदिरा जवळ, घोडेगाव परिसर,यांना ताब्यात घेऊन त्यांच्या गोडावून मध्ये असलेला गोवा राज्यातील दारूचा साठा जप्त केला आहे.

परराज्यातील विदेशी मद्यसाठा बेकायदेशीरपणे साठवणूक केल्याप्रकरणी संबंधितांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा,1949 अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून कोपरगाव येथील राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक यांच्या कार्यालयाच्या वतीने पुढील तपास सुरू आहे,

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular