नेवासा दि २० फेब्रुवारी- प्रतिनिधी आदित्य सुकाळकर
नेवासा शहराचे ग्रामदैवत श्री. मोहिनीराज महाराज यांची सालाबादप्रमाणे यात्रा उत्सवानिमित्त मोहिनीराज मंदिराच्या कळसावर झेंडा लावण्याची परंपरा अनेक वर्षांपासून चालत आली आहे. मात्र गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीच्या निर्बंधांमुळे मिरवणुकी व यात्रा उत्सव अगदी छोट्या प्रमाणावर चालू ठेवण्यात आल्या होत्या.
या वर्षी यात्रा महोत्सवाचे स्वरूप वाढवावे म्हणून यात्रा कमिटी अनेक प्रयत्न करताना दिसत आहे. याच प्रयत्नाला भरीव हाथभर लावत राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख आणि शंकरराव गडाख मित्र मंडळाने रविवारी दुपारी चार वाजता नेवासा शहरात भव्य झेंडा मिरवणुकीचे नियोजन केले आहे.
ही मिरवणूक मळगंगा देवी पासुन सुरू होणार आहे या मिरवणुकीसाठी मंत्री शंकरराव गडाख स्वतः उपस्थित राहणार आहेत. मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण पुणे येथील स्वराज्य ढोल ताशा पथक असणार आहे.