पुणे –
पुणे तिथे काय उणे असे नेहमीच बोलले जाते आणि पुणेरी पाट्यांचे तर जगभर कौतुक झाले आहे. आणि याचा पुणेकरांना अभिमान आहे अस पुणेकर नेहमी सांगत असतात. पुण्यात वेगवेगळ्या पाट्यांवरून नेहमीच चर्चेचा विषय असतो. तर सध्या ही अशाच एका बॅनर मुळे पिंपरी-चिंचवडमध्ये एक चर्चेचा झालाय. “सहावीला पिंपरी चिंचवडला आलो” असे वाक्य लिहिलेले पोस्टर सगळ्यांचे लक्ष्य वेधून घेत आहे. पोस्टर पाहणारा प्रत्येक जण या वाक्यावर विचार करतोय आणि त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करतोय. शहरातील नेहरूनगर – यशवंतनगर रस्त्यांवर हे फ्लेक्स लावण्यात आले आहेत. या पोस्टरचे फोटो सोशल मिडियावर जोरदार व्हायरल झाले आहेत.
याआधीही शहरामध्ये वेगवेगळी वाक्ये लिहलेली अनेक पोस्टर्स लागल्याचे पाहायला मिळाले होते. यातील वाक्यांचा संदर्भ लवकर मिळत नसला तरी त्याची चर्चा जोरदार होते. शहरात फ्लेक्सबाजी काय थांबता थांबत नाहीये. याआधी ‘शिवडे, आय एम सॉरी’ अशा पोस्टरने खळबळ माजवली होती. आता सध्या असेच एक बॅनर शहरात झळकत आहे. आता या पोस्टर मागचा धनी कोण याकडेच सगळ्यांचे लक्ष लागले आहे.