Homeजिल्हा'चायना' मांजावर बंदी असतानाही नगर शहरात विकला जातोय सर्रास चायना मांजा पशुपक्षी...

‘चायना’ मांजावर बंदी असतानाही नगर शहरात विकला जातोय सर्रास चायना मांजा पशुपक्षी आणि मानवाला ईजा पोहचवणाऱ्या चायना मांजा विक्रेत्यांवर कारवाई कधी?.

advertisement

अहमदनगर दि .५ जानेवारी
मकरसंक्रांतीचा सण जवळ आल्याने पतंग व मांज्याच्या
विक्रीने जोर पकडला आहे.चायना मांज्यावर बंदी
असतानाही त्याची सर्रास विक्री केली जाते. त्यामुळे शहरातून फिरताना सामान्य नागरिकांना अनेक अपघातांना नेहमीच सामोरे जावे लागते.चायना मांजा सहजा सहजी तुटत नसल्याने असा मांजा आडवा आला तर थेट गंभीर इजा होते.

चायना मांजा मुळे दरवर्षी अनेकांचे गळे कापण्याच्या घटना घडत असतात काहींचे जीव गेले आहेत  तर चायना मांजा पायात अडकून अनेक पक्षीही प्राणाला मुकत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरीक, वाहन चालक व पक्ष्यांच्या जिवाशी खेळणारा चायना मांजा विक्रीचा धंदा कठोर कायदेशीर कारवाई करुन कायमचा बंद केला पाहिजे. मात्र हा मांजा नगर शहरात अनेक दुकानात खुलेआम विक्री होत आहे.

महापालिका प्रशासन काही मांजा विक्री करणाऱ्या दुकानावर जाऊन चायना मांजा जप्त करतात व त्याची होळी करतात मात्र महानगरपालिकेच्या अधिकार्‍यांची पाठ फिरताच पुन्हा चायना मांजा सर्रास विक्री केला जातो. त्यामुळे किरकोळ दंड न करता अशा विक्रेत्यांवर मोठा आर्थिक दंड आणि कायदेशीर कारवाई केली तरच असे चोरीछुपे मांजा विकणाऱ्यांवर जरब बसेल अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular