अहमदनगर दि.८ जानेवारी
अहमदनगर शहरातील चितळे रोड परिसरात असलेल्या अत्यंत जुनी आणि नावाजलेल्या दत्त बेकर्स या बेकरी ला सायंकाळी पाचच्या सुमारास आग लागली होती. अहमदनगर महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाने तातडीने धाव घेत आग विझवण्याचे प्रयत्न केले.आग विझवण्याचे काम सुरू असून शहरातील अतिक्रमणांमुळे बारीक झालेल्या रस्ता वरून वरून या ठिकाणी येण्यास अडथळा झाला होता.
चितळे रोडवर अनेक ठिकाणी अतिक्रमण झाले असून भाजीवाले रोडवर बसत असल्याने अनेक वेळा या ठिकाणी ट्रॅफिक जाम होत असते.आजही त्याचा प्रत्यय आला असून अग्निशामक दलाला चितळे रोडवर येण्यास या अतिक्रमणामुळे अडथळा आला होता.
सुधीर परदेशी यांची हे दत्त बेकर्स असून अनेक वर्षापासून दत्त बेकरीच्या माध्यमातून नगरकरांना उत्कृष्ट सेवा देत होते.ही आग कशामुळे लागली याबाबत अद्याप कोणतेही कारण समोर आले नाही. तोफखाना पोलीस स्टेशन आणि कोतवाली पोलिस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
या बेकरी च्या आसपास मोठी मानवी वसाहत असून अत्यंत वर्दळीच्या आणि जवळ दुकान असल्याने या परिसरात काही वेळ धावपळ उडाली होती मात्र आत्ता सध्या परिस्थिती नियंत्रण आहे.