अहमदनगर दि ६ फेब्रुवारी
कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या महात्मा फुले चौक येथे केतन पोपटराव शेंडगे यांची रोख रक्कम नव्वद हजार रुपये चोरीस गेली होती.
शेतीचे आलेल्या पैश्याची एफ डि करण्या करीता शेंडगे महात्माफुले चौक मार्केट यार्ड येथुन रोडने त्यांचे इनोव्हा गाडीने जात असताना त्यांना एका मोटार सायकल वरिल दोन हेल्मेट स्वारीनी तुमच्या गाडीचा आम्हाला धक्का लागला असे म्हणुन बोलण्यात गुंतवुन त्यांचे गाडीतील ठेवलेली त्यांची रोख रक्कम चोरुन नेली होती या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास कोतवाली पोलीस ठाण्याचे पोसई मनोज कचरे हे करत असताना तपासा दरम्यान विशेष परिश्रम घेवुन कोतवाली पोलीसांनी युनिकॉन मोटार सायकल वरिल हेल्मेट गँग अटक करुन तपास करत असताना आरोपी नामे जिग्नेश दिनेश घासी याच्या कडुन केतन पोपटराव शेंडगे यांची चोरी केलेली रोख रक्कम हस्तगत करण्यात आली होती.
या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशाने केतन पोपटराव शेंडगे यांना त्यांची चोरी गेलेली नव्वद हजरांचा रक्कम पुन्हा परत देण्यात अली आहे.सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक मनोज पाटील,अपर पोलीस अधिक्षक सौरभ अग्रवाल , नगर उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे, पोसई मनोज कचरे, पोहेकाँ दिपक साबळे, पोहेकाँ सतिश भांड, पोना योगेश भिंगारदिवे, पोना सागर पालवे, पोना शरद गायकवाड, पोना अशोक शिंदे, मपोना कविता गडाख, पोकाँ तानाजी पवार, पोकाँ सुजय हिवाळे, पोकाँ दिपक रोहकले, पोकाँ सोमनाथ राउत, पोकाँ अमोल गाढे, पोकाँ संदीप थोरात, मपोकाँ वसुधा भगत यांनी केली आहे.