अहमदनगर दि.७ फेब्रुवारी
रविवारी अहमदनगर शहरात माळीवाडा बस स्थानका शेजारी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे नूतनीकरण करण्यात आले आहे.
या नूतनीकरण केलेल्या पुतळ्याचे लोकार्पण करण्याचा कार्यक्रम झाला असून आता हा कार्यक्रम चांगलाच वादात सापडला आहे.
या कार्यक्रमावर शिवसेनेच्या अधिकृत फेसबुक पेजवर शहराचे आमदार संग्राम जगताप यांचे नाव न घेता टीका करण्यात आली तर सोमवारी अहमदनगर शहर कांग्रेसने या कार्यक्रमावर आक्षेप घेत या कार्यक्रमात हिडीस गाणे लावले आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला असल्याने शहराच्या आमदारांनी याच पुतळ्या समोर नाक घासून माफी मागावी अशी मागणी शहर कांग्रेसचे अध्यक्ष किरण काळे यांनी पत्रकार परिषदेत केली
रविवारचा कार्यक्रम हा फक्त काही विशिष्ट राजकारण्यांनी केला असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जय घोषा बरोबर काही ठराविक लोकांच्या नावाच्या घोषणा दिल्या गेल्या हे निंदनीय असल्याचं किरण काळे यांनी स्पष्ट केलंय
या पत्रकार परिषदेत किरण काळे यांनी यावेळी रविवारच्या कार्यक्रमाचे काही व्हिडीओ दखवले आणि कशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाल्याचं निदर्शनास आणून दिल.
या पत्रकार परिषदेत सय्यद खालील,मनोज गुंदेचा,विशाल घोलप,अनंत गारदे, अजीस चुडीवाला, दशरथ शिंदे,प्रवीण गीते,उषाताई भगत उपस्थित होते.