अहमदनगर दि १६ मार्च
अहमदनगर शहरातील नवीन महानगरपालिकेच्या आवारामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती बसवण्याचे नियोजन करण्यात आले आहे तसेच प्रोफेसर कॉलनी चौक येथे छत्रपती संभाजी महाराज तर मार्केट यार्ड चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा आणि माळीवाडा येथील महात्मा ज्योतिराव फुले यांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्याचे नियोजन करण्यात आले असून या महामानवांचे पुतळे बसवण्यासाठी सध्या विविध संघटना आक्रमक झाक्या आहेत काही दिवसांपूर्वी महानगरपालिकेत काही संघटनांनीआंदोलनही केले होते.
त्या पार्श्वभूमीवर बुधवारी शहराचे पोलीस उपाधीक्षक अनिल कातकडे यांनी या चार ठिकाणच्या जागांची पाहणी केली यावेळी त्यांच्यासोबत महानगरपालिकेचे शहर अभियंता सुरेश इथापे यांच्यासह महानगरपालिकेचे कर्मचारी उपस्थित होते या तिन्ही नियोजित जागांची पाहणी करून पोलिस प्रशासन याबाबतचा अहवाल सादर करणार आहे अशी माहिती शहर पोलिस उपअधीक्षक अनिल कातकडे यांनी दिलीय.