Homeक्राईमजागेच्या वादातून पाईपलाईन रोडला पिस्तूल डोक्याला लावत पती पत्नीस मारहाण करून केली...

जागेच्या वादातून पाईपलाईन रोडला पिस्तूल डोक्याला लावत पती पत्नीस मारहाण करून केली जातीवाचक शिवीगाळ तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

advertisement

अहमदनगर दि ८ मार्च
अहमदनगर उपनागरामधील पाईपलाईन रोड ला जागेच्या वादावरून थेट पिस्तुल डोक्याला लावून पती पत्नीस मारहाण केल्याची घटना बुधवारी दुपारी साडेचार वाजता घडली आहे या बाबत तोफखाना पोलीस ठाण्यात कुलदीप भिंगरदिवे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबतची हकीगत अशी की भिंगारदेवे व त्यांची पत्नी भाजी आणण्यासाठी यशोदा नगर मध्ये जात असताना जीशान शेख या युवकाने कुलदीप भिंगारदिवे यांना आडवून जागेच्या वादात तू पडू नकोस असा दम दिला याबाबत कुलदीप भिंगरदिवे यांनी हा वाद कोर्टात चालू असून जो निर्णय लागेल तो अम्ही मान्य करू असे सांगितले याचा राग येऊन जीशान शेख याच्या बरोबर असलेल्या अनोळखी इसमांनी कुलदीप भिंगरदिवे यांना मारहाण करत शिवीगाळ सुरू केली.

हा प्रकार पाहून कुलदीप भिंगारदिवे यांची पत्नी भांडण सोडवण्यासाठी मध्ये पडली असता कुलदीप भिंगारदिवे यांच्या पत्नीसही मारहाण करण्यात आली तसेच जीशान शेख याने आपल्याजवळील बंदूक त्याच्या सोबत असणाऱ्या तन्मीन शेख याच्या कडे दिली आणि त्याने ती बंदूक कुलदीप भिंगारदिवे यांच्या डोक्याला लावली ही घटना पाहून कुलदीप भिंगारदिवे यांच्या पत्नीने त्या ठिकाणी माफी मागत भांडण मिटवून घेण्याची विनंती केली आणि तेथून निघुन गेले.

या प्रकरणी जातिवाचक शिवीगाळ करत जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या जिशान शेख,अशोक शेकडे,तन्मीन शेख आणि अन्य चार अनोळखी लोकांवर कुलदीप भिंगारदिवे यांच्या फिर्यादीवरून रात्री उशिरा तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular