अहमदनगर दि २५ मार्च
२०२२ चा जिजाऊ ब्रिगेडचा राजमाता जिजाऊ पुरस्कार वृत्त निवेदिका आणि नाट्य सिनेअभिनेत्री राणी कासलीवाल यांना प्रदान करताना जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील आणि राहुरीच्या माजी नगराध्यक्ष उषाताई तनपुरे समवेत जिजाऊ ब्रिगेड च्या विभागीय संघटक अनिता काळे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
अहमदनगरच्या प्रसिद्ध निर्भीड वृत्तनिवेदिका आणि नाट्य तथा सिनेअभिनेत्री राणी कासलीवाल यांना विजया लक्ष्मण काळे फाऊंडेशन व जिजाऊ ब्रिगेड यांच्या संयुक्त विद्यमाने 2022 चा राजमाता जिजाऊ पुरस्कार देण्यात आला नगर शहरातील माऊली संकुल या ठिकाणी हा पुरस्कार सोहळा पार पडला.
राणी कासलीवाल यांनी कोरोना काळात आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून वृत्तवाहिनीच्या माध्यमातून समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत माहिती देण्याचे काम वृत्त निवेदिकेच्या माध्यमातून केले असून वृत्तनिवेदिका म्हणून त्या नेहमीच निर्भीडपणे काम करत असतात तर अभिनेत्री म्हणून देखील त्यांनी टीव्ही सिरीयल व्यावसायिक नाटक, राज्य नाट्य, वेबसिरीज, शॉर्ट फिल्म ,सिनेमा ,जाहिरातीच्या माध्यमातून एकापेक्षा एक सरस भूमिका साकारत उत्कृष्ट असा आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.
त्यांच्या या दोन्ही क्षेत्रातील उत्कृष्ट कामाची दखल घेत त्यांना राजमाता जिजाऊ पुरस्कार प्रदान करण्यात आला असे जिजाऊ ब्रिगेड च्या विभागीय संघटक अनिता काळे यांनी सांगितले.