अहमदनगर प्रतिनिधी
अहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालयात लागलेल्या आगी प्रकरणी पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये एका वैद्यकीय अधिकाऱ्यासह चार परिचारिकांना पोलिसांनी अटक केली होती सी सी टीव्ही च्या आधारे पोलिसांनी कर्मचारी आणि अधिकारी दोषी असल्याचा ठपका ठेवला होता अटक केल्यानंतर न्यायालयाने त्यांना दोन दिवसासाठी पोलिस कोठडी सुनावली होती त्यानंतर आज पुन्हा त्या एका अधिकऱ्यासह चार कर्मचार्यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांची रवानगी न्यायालइन कोठडीत केली होती. तर आरोपींच्या वतीने न्यायालयात ऍडव्होकेट महेश तवले आणि विक्रम शिंदे , निलेश देशमुख यांनी या प्रकरणात असलेल्या आरोपींना जामीन मिळावा यासाठी मुख्य न्यायदंडाधिकारी तिवारी यांच्या समोर जामीन अर्ज दाखल केला होता पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्या मध्ये प्रथम 304 (अ)कलम लावला होता मात्र तो बदलून दुसऱ्या दिवशी 304 कलम लावण्यात आला होता तसेच यामधील ज्या परिचारिका आहेत त्या स्वच्छेने कामावर आल्या होत्या त्यांचं या प्रकरणात कोणताही अपघात घडवण्याचा हेतू नव्हता अशी बाजू मांडली होती न्यायालयाने सरकारी वकील आणि आरोपींच्या वकिलांची बाजू ऐकून घेत चारही आरोपींचे जामीन फेटाळले आहेत. प्रकरणामध्ये आरोपींविरुद्ध चे कलम लावले आहेत त्या बाबत या कोटाला जमीन देण्याचा अधिकार नसल्याने जामीन फेटाळला असल्याचं न्यायालयाने स्पष्ट केले आहे या प्रकरणी आता जिल्हा सत्र न्यायालया मध्ये दाद मागणार असल्याचे एडवोकेट महेश तावले आणि ऍड. विक्रम शिंदे यांनी सांगितले आहे.