अहमदनगर प्रतिनिधी-
अहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता कक्षास आग लागून आतापर्यंत चौदा रुग्णांचा मृत्यू झाला आहे १२ रुग्ण आग लागली त्या दिवशीच मृत झाले होते तर इतर रुग्ण खासगी दवाखान्यांमध्ये उपचार घेत असताना त्यांचा मृत्यू झाला आहे .आग लागल्यानंतर राज्य मंत्रिमंडळातील अनेक वरिष्ठ मंत्र्यांनी या अग्नितांडवास जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई होईल असे आश्वासन देऊन गेले तर या अग्नितांडवा मध्ये मृत्यू पावलेल्या रुग्णांच्या कुटुंबीयांना सात लाख रुपयांची आर्थिक मदतही देण्यात आली.मात्र या अग्नितांडवला कारणीभूत कोण हा प्रश्न अजूनही अनुत्तरित राहिला आहे. सरकारने या घटनेची चौकशी करण्यासाठी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी नेमली होती त्या कमिटीचा अहवाल सात दिवसात आल्यानंतर जो दोषी असेल त्याच्यावर कठोर कारवाई करू असे आश्वासन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी अहमदनगर मध्ये बोलताना दिलं होतं मात्र या घटनेला आता बावीस दिवस उलटूनही या समितीचा अहवाल आला ना कोणती कारवाई झालेली दिसून येत नाही. पोलिसांनी या प्रकरणी रुग्णालयातील चार कर्मचाऱ्यांना अटक केली होती त्यापलिकडे कोणतीच कारवाई झाल्याचं समोर येत नाही मुख्य विद्युत निरीक्षकांचा अहवालही पोलिसांना देण्यात आला नाही त्यामुळे पोलिसांचा तपास थंडावला आहे. तर निलंबित जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुनील पोखरणा यांना अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. याप्रकरणी जरी डॉक्टर सुनील पोखरणा यांना दिलासा मिळाला असला तरी डॉक्टर सुनील पोखरणा आणि जिल्हा रुग्णालयातील आणखी एक डॉक्टर यांच्याविरुद्ध एक तक्रार अर्ज पोलिसांना प्राप्त झाला असून या तक्रार अर्जावर पोलिस आता चौकशी करणार आहेत. डॉक्टर सुनील पोखरणा यांच्या मुलाचे दिव्यांगाचे सर्टिफिकेट आणि जिल्हा रुग्णालयातील आणखी त्या डॉक्टर च्या मुलाचे दिव्यांगाचे सर्टिफिकेट खोटे असल्याचा दावा या तक्रार अर्जामध्ये करण्यात आला आहे. पोलीस आता या तक्रार अर्जावर तपास करणार असून यामुळे डॉक्टर सुनील पोखरणा यांच्यासमोरील अडचणी अद्यापही दूर झालेल्या नाहीत.