Homeजिल्हाजिल्हा रुग्णालय अग्नीतांडव पी.डब्लू.डी. विद्युत विभागाकडे पोलिसांचा मोर्चा कधी ? या अग्नीतांडवास...

जिल्हा रुग्णालय अग्नीतांडव पी.डब्लू.डी. विद्युत विभागाकडे पोलिसांचा मोर्चा कधी ? या अग्नीतांडवास जबाबदार असणाऱ्या कोणालाच सोडू नका मृत रुगणांच्या कुटुंबियांची मागणी

advertisement

अहमदनगर प्रतिनिधी

६ नोव्हेंबर रोजी अहमदनगर येथील शासकीय रुग्णालयामधील कोविड वॉर्डला आग लागून ११ रुग्णांचा मृत्यू झाला होता यानंतर त्यादिवशी रात्री पोलिसांनी स्वतः फिर्यादी होत तोफखाना पोलीस स्टेशन मध्ये या घटनेबाबत गुन्हा दाखल केला होता सुरुवातीला अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला यानंतर सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी या गुन्ह्यात वाढीव कलम लावून जिल्हा रुग्णालयातील एका वैद्यकीय अधिकाऱ्यासह चार परिचारिकांना अटक केली होती सध्या पोलिस कस्टडी मध्ये आहेत. ज्या दिवशी आग लागली त्यानंतर दोन दिवसात आरोग्य मंत्र्यांसह विविध मंत्र्यांनी जिल्हा रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली तसेच याबाबत लवकरात लवकर दोषींवर कारवाई होईल असे आश्वासन दिले होते याप्रकरणी नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली व ती समिती सध्या या घटनेबाबत चौकशी करत आहे. मात्र एक गोष्ट यामध्ये प्रकर्षाने जाणवत आहे जेव्हा जिल्हा रुग्णालयातील कोविड वॉर्ड ला आग लागली त्यावेळेस कामावर असणाऱ्या परिचरिकांच्या हलगर्जीपणा केला म्हणून पोलिसांनी त्यांना अटक केली. मात्र ही बिल्डिंग ज्या सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधली आणि त्यांच्याच विद्युत विभागाने लाईट चे काम केले होते .तेव्हा या विभागाने कोणतीही पूर्तता न करता ही बिल्डिंग जिल्हा रुग्णालयाला वापरास कशी दिली तसेच फायर ऑडीट मधील त्रुटी समोर आल्या असतानाही त्या पूर्ण का केल्या नाही.याबाबत कोणीच काही बोलायला तयार नाही त्यामुळे आता पोलिसांचा मोर्चा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत विभागातील अधिकाऱ्यांकडे कधी वळतोय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.कारण या एकूण सर्व प्रकारानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचा विद्युत विभाग दोषी दिसत असल्याचं समोर येत आहे मात्र काही तांत्रिक बाबींवर हा विभाग हात झटकण्याचा प्रयत्न करत आहे. पोलिसांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली तर निश्चितच खरे कारण समोर येईल. रुग्णालयाला लागलेल्या आगीत 11 जणांचा मृत्यू झाला असून हा प्रकार अत्यंत वेदनादायक आहे त्यामुळे यामध्ये दोषी असणाऱ्या कोणत्याही विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सोडू नका अशी भावना मृत पावलेल्या कुटुंबीयांकडून व्यक्त होत आहे

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular