Homeजिल्हाजिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुनील पोखर्णा यांच्या हलगर्जीपणामुळेच जिल्हा रुग्णालयात झाली अग्नितांडव पोलिसांनी...

जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुनील पोखर्णा यांच्या हलगर्जीपणामुळेच जिल्हा रुग्णालयात झाली अग्नितांडव पोलिसांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून द्यावी ही बाब शिवसेना उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांची मागणी

advertisement

अहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालयात झालेल्या अग्नितांडाव प्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुनील पोखर्णा यांनी न्यायालयात धाव घेत अंततीम अटकपूर्व जामीन मिळवला आहे. मात्र याबाबत पोलिसांनी न्यायालयाला डॉक्टर सुनील पोखर्णा यांनी केलेल्या हलगर्जीपणामुळेच आग लागली असल्याचे निदर्शनास आणून द्यावे अशी मागणी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

जिल्हा रुग्णालयाला अहमदनगर महानगर पालिकेच्या अग्निशमन विभागाने २०१२ पासून ते २०२१ पर्यंत लेखी पत्र देऊन फायर ऑडिट मध्ये आलेल्या त्रुटी संदर्भात कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. मात्र जिल्हा शल्यचिकित्सक या नात्याने रुग्णालयातील ही कामे करून घेण्याचं जबाबदारी डॉक्टर सुनील पोखर्णा यांची होती. मात्र ही जबाबदारी त्यांनी टाळली असल्याने जिल्हा रुग्णालयात मोठी दुर्घटना घडून अकरा निष्पाप रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पोलिसांनी याबाबत न्यायालयास अवगत करून द्यावे अशी मागणी गिरीश जाधव यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular