HomeUncategorizedजिल्हा शासकीय रुग्णालयात लागलेल्या आगी प्रकरणी राज्य सरकारने स्थापन केलेल्या समिती मधील...

जिल्हा शासकीय रुग्णालयात लागलेल्या आगी प्रकरणी राज्य सरकारने स्थापन केलेल्या समिती मधील तो अधिकारीच दोषी असल्याने त्याची चौकशी करण्यासाठी समितीला पत्र देणार – आ.संग्राम जगताप

advertisement

अहमदनगर – प्रतिनधी

अहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालयात शनिवारी आग लागून अकरा रुग्णांचा मृत्यू झाला होता त्यानंतर ही आग नेमकी कशी लागली तसेच त्या आगीला कारणीभूत कोण आणि कोणाच्या दिरंगाईमुळे हे प्रकरण घडले याबाबत अनेक आरोप-प्रत्यारोप झाले अखेर राज्य सरकारने या प्रकरनाची सखोल चौकशी करण्यासाठी नाशिक विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली आठ जणांची समिती नेमली असल्याची घोषणा केली यामध्ये अहमदनगर महानगरपालिकेचे प्रतिनिधी म्हणून अग्निशामक दलाचे अधिकारी शंकर मिसाळ यांचाही समावेश करण्यात आला आहे मात्र थेट शंकर मिसाळ यांच्यावरच बेजबाबदारपणाचा आरोप करत या घटनेला तेही कारणीभूत असल्यामुळे त्यांची चौकशी होणे गरजेचे असून याबाबत चौकशी समितीला अर्ज देणार असल्याचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले आहे

महानगरपालिका खासगी रुग्णालयांना परवानगी देताना सर्व नियम पाळून परवानगी देतात मात्र शासकीय रुग्णालयाला परवानगी देत असताना ढिलाई का केली तसेच सध्या कोविड संक्रमणाचा काळ कमी असल्याने तो भाग बंद करून आग प्रतिबंधक साधने बसवण्या साठी महापालिकेने नोटीस देणे गरजेचे होते मात्र तसे न करता महापालिकेने फक्त 2015 व त्यानंतर दोन वेळेस नोटीस देऊन आपली जबाबदारी झटकली असल्याचा आरोप आमदार संग्राम जगताप यांनी केला आहे हा भाग जर सिल केला असता तर एवढी मोठी दुर्घटना टळली असती असही संग्राम जगताप यांनी सांगितले आहे त्यामुळे या चौकशी समिती मधील अधिकारीच आता चौकशीच्या फेऱ्यात अडकतो काय असा प्रश्न समोर येते

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular