मुंबई -दि२ मार्च
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु रामदास स्वामी होते म्हणून त्यांची ओळख होती असं वक्तव्य केलं होतं.
या वक्तव्यावरुन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या गदारोळ उठला असून छत्रपती शिवाजी महाराज हे स्वयंप्रेरित राजे होते रामदास स्वामी हे त्यांचे गुरू नव्हते याबाबत अनेक ऐतिहासिक पुरावे सादर करण्यात आले होते त्यामुळे राज्यपालांनी महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी होत असताना त्यांच्या पेक्षा खूप लहान असलेल्या आणि नुकतीच महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्याअध्यक्षपदाची माळ ज्यांच्या गळ्यात पडली असे अमित राज ठाकरे यांनी शिवसंस्कार काय असतात हे आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.
अमित ठाकरे यांची विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदी निवड झाल्या नंतर अहमदनगर जिल्ह्याच्या वतीने अहमदनगर जिल्ह्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा यांनी नुकतीच मुंबई येथे अमित ठाकरे यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या आणि सत्कार केला सुमित वर्मा अमित ठाकरे यांच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती भेट म्हणून घेऊन गेले होते पुष्पगुच्छा आणि शाली सोबत छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती पाहताच सर्वांना थांबवात अमित ठाकरे यांनी आपल्या पायातील बूट काढून मूर्तीचा स्वीकार केला.
या कृतीने भेटण्यास आलेल्या सर्वांचीच मने अमित ठाकरे यांनी जिंकून घेतली.स्व.बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दलचा मान आदर आणि प्रेम कसे राखावे हे अनेक वेळा आपल्या कृतीतून सिद्ध करून दिल आहे. त्याच पावलावर पाऊल ठेवत अमित राज ठाकरे आपली वाटचाल करत असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदी योग्य व्यक्तीची निवड झाल्याची भावना त्यांना भेटण्यास गेलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.
अमित ठाकरे हे युवकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी लवकरच महाराष्ट्र राज्याचा दौरा करणार असून अहमदनगर जिल्ह्यातही मोठा वा मेळावा घेणार असल्याची माहीती सुमित वर्मा यांनी दिलीय.