Homeक्राईमठाणे येथील चालकाला नगर- दौंड रोडवर लुटले सुमारे बारा हजारांचा ऐवज लंपास...

ठाणे येथील चालकाला नगर- दौंड रोडवर लुटले सुमारे बारा हजारांचा ऐवज लंपास कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

advertisement

अहमदनगर दि.८ जानेवारी
दबा धरून बसलेल्या चोरट्यांनी ठाणे येथील एका चालकाला सुमारे बारा हजारांगना लुटल्याची घटना नगर दौंड रोडवरील जस्ट इन अव्हेन्यू हॉटेल समोर घडली आहे. सुमारे सात ते आठ चोरट्यांनी प्रविणकुमार सुरेश सिंग याना लुटले असून रोख रकमेसह रेड मी कंपनीचा मोबाईल आणि ब्लु टूथ चोरट्यांनी लंपास केला आहे. प्रवीणकुमार सिंग यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चोरटे काळ्या रंगाच्या बुलेट वर तसेच होंडा कंपनीच्या एका दुचाकीवर आले होते. काठीने मारहाण करत फायटर चाकूने सहाय्याने प्रवीण कुमार सिंग यांना धाक दाखवून पाच हजार रुपयांची रोख रक्कम रेड मी कंपनीचा मोबाईल आणि ब्ल्यू टूथ असा बारा हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.

गुन्हा दाखल झाल्यानंतर शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक अनिल कातकडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय एस.के. दुर्गे या घटनेचा तपास करत आहेत.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular