Homeजिल्हाठेकेदारांच्या कामबंद आंदोलना नंतर आता महापालिका कर्मचाऱ्यांचे "या" मागणी साठी धरणे आंदोलन!...

ठेकेदारांच्या कामबंद आंदोलना नंतर आता महापालिका कर्मचाऱ्यांचे “या” मागणी साठी धरणे आंदोलन! महापालिकेचे कामकाज ठप्प होण्याच्या मार्गावर

advertisement

अहमदनगर प्रतिनिधी
अहमदनगर महानगरपालिकेतील सफाई कामगारांना सकाळच्या सत्रात एक पगारी काम नेमून देण्याच्या महापौर आणि स्थायी समितीच्या सभापतींच्या आदेशास महानगरपालिका प्रशासनाने केराची टोपली दाखवली यामुळे महानगरपालिका कर्मचारी करणार सोमवारपासून महापालिकेसमोर धरणे आंदोलन नगर शहरातील सर्व कामे ठप्प होण्याच्या मार्गावर असून याबाबत महानगरपालिका कामगार युनियन च्या वतीने अहमदनगर महानगरपालिका आयुक्त शंकर गोरे तसेच महापौर रोहिनीताई शेंडगे यांना पत्र देण्यात आले आहे. महापालिकेतील सफाई कामगारांना सकाळच्या सत्रात एकपारगी काम नेमून देण्याच्या युनियनच्या मागणीबाबत विचारविनिमय करण्यासाठी महापालिकेच्या महापौर रोहिणीताई
शेंडगे,स्थायी समिती सभापती अविनाश घुले यांचे उपस्थितीत महापौर कार्यालयात बैठक संपन्न झाली होती. या बैठकीस महापालिकेचे आयुक्त शंकर गोरे , उपायुक्त यशवंत डांगे घनकचरा व्यवस्थापन प्रमुख शंकर शेडाळे तसेच युनियनचे पदाधिकारी उपस्थित होते. सदर बैठकीत युनियनच्या मागणीबाबत त्रिपक्षीय चर्चा होवून १ डिसेंबर २०२१ रोजीपासून महापालिकेतील सर्व सफाई कामगारांना सकाळच्या सत्रात एकपारगी काम नेमुन देण्याचे आदेश महापौर रोहिणीताई शेंडगे व स्थायी समिती सभापती
अविनाश घुले यांनी महापालिका प्रशासनास दिले होते.
महापालिका प्रशासनाने हे आदेश मान्य केले होते.
त्यानंतर या मीटिंग नंतर या आदेशास महापालिका प्रशासनाने केराची टोपली दाखवल्याचे दिसून येत आहे. सकाळ व दुपारच्या सत्रात महापालिकेतील सफाई कामगारांकडून काम करून घेण्याच्या सुचना संबंधीत खात्याच्या अधिका-यांना तोंडी स्वरूपात देवून अंमलबजावणी करण्याचे. सक्ती करण्याचे धोरण स्विकारले आहे. त्यास अनुसरून घनकचरा व्यवस्थापन विभागाचे अधिका-यांनीही सफाई कामगारांवर दडपशाही करण्याचे सत्र अवलंबिले आहे. त्यामुळे महापालिकेतील सफाई कामगारांमध्ये तिव्र अंसतोष निर्माण झालेला असून महापालिका प्रशासनाच्या सदरच्या मानी धोरणाच्या विरोधामध्ये महापालिकेतील सफाई कामगारांसह सर्व कर्मचारी सहा डिसेंबर पासून महापालिकेत धरणे आंदोलन करणार असल्याचा इशारा महापालिका कामगार युनियनने दिला आहे त्यामुळे आता नगर शहरातील सर्व कामे ठप्प होण्याच्या मार्गावर असून. याआधीच ठेकेदार संघटनेने बिल मिळत नसल्याच्या कारणावरून काम बंद आंदोलन सुरू केले आहे.त्यामध्ये सफाई कामगार आणि इतर कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले तर संपूर्ण शहर ठप्प होईल त्यामुळे महापालिका प्रशासनाला आता ा दोन्ही प्रश्‍नांवर गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे.सुथो

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular