- अहमदनगर दि.२७ मार्च
पोलिस म्हटले की त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन काही वेगळाच असतो मात्र सर्व पोलीस सारखे नसतात बोटावर मोजण्याइतक्या पोलिसांच्या चुकीच्या कृत्यामुळे अनेक वेळा सर्व पोलिसांना टीकेचा सामना करावा लागतो मात्र काही पोलिसांच्या चांगल्या कृत्यामुळे पोलिसांच्या कामाचे कौतुकही होते .
अहमदनगर शहारत नुकतीच तिथी नुसार शिवजयंती साजरी करण्यात आली शिवजयंतीच्या निवडणुकीमध्ये अनेक तरुण उत्साहाने सहभागी झाले होते त्याचबरोबर अनेक अल्पवयीन मुलांचा शिवजयंती मिरवणुकीत सहभाग होता.
एका शिवजयंती मिरवणूक मंडळाच्या ट्रॅक्टर वर काही मुले उभा राहून नाचत असताना एका अल्पवयीन मुलाचा तोल जाऊन तो खाली पडला आणि जखमी झाला मंडळातील तरुणांनी त्याला उचलून गर्दीतून एका बाजूला नेले खरे मात्र त्याला तिथेच एका दुकानाच्या ओट्यावर झोपवण्यात आले होते मात्र त्याला दवाखान्यात नेण्यासाठी कोणीच पुढे येत नसल्यामुळे ही सर्व घटना पाहत असणाऱ्या या ठिकाणी बंदोबस्तात उपस्थित असणाऱ्या पोलिसाने त्याला दोन्ही हातात उचलून दवाखान्यात उपचारासाठी घेऊन निघाला हे पाहताच मंडळाचे अनेक कार्यकर्ते धावले आणि त्या मुलाला त्यांनी उपचारासाठी दवाखान्यात नेले.
विशेष म्हणजे आधी मोठी गर्दी या मुलाकडे फक्त पाहत उभी होती आणि एकमेकांना सल्ले देत होती मात्र त्या पोलिसाने मुलाला उचलून दवाखान्यात नेण्याचा प्रयत्न करताच अनेक तरुण पुढे आले आणि त्या मुलाला दवाखान्यात घेऊन गेले पोलिसाच्या या कर्तव्यदक्षते मुळे अनेकांनी या कामाचं कौतुक केल आहे. या कर्तव्यदक्ष पोलिसाचे नाव संतोष चव्हाण असून तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये पोलीस नाईक पदावर सध्या कार्यरत आहेत.
पोलीस नाईक संतोष चव्हाण यांनी कर्तव्यावर असताना माणुसकीचे चांगले उदाहरण समाजसमोर ठेवले आहे पोलीस नारीकांचे रक्षण करण्यासाठी सदैव तत्पर असतो हे संतोष चव्हाण यांच्या कृतीतून समोर आले आहे.