Homeशहरडॉ.निलेश म्हस्के यांना मारहाण डॉक्टरांचे ओपीडी बंद आंदोलन

डॉ.निलेश म्हस्के यांना मारहाण डॉक्टरांचे ओपीडी बंद आंदोलन

advertisement

पाथर्डी दि .९ एप्रिल
पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील एका डॉक्टरला मारहाण करण्यात आलीय शुक्रवारी द्दुपारी एक वाजण्याच्या सुमारास तिसगाव येथील स्त्रीरोग तज्ञ डॉ.निलेश म्हस्के यांना पाच ते सहा अज्ञात तरुणांनी त्यांच्या हॉस्पिटल मध्ये येऊन मारहाण केल्याची घटना घडली आसुन या घटनेमुळे तालुक्यातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

मात्र याबाबत पोलिस ठाण्यात सायंकाळी उशिरा पर्यंत कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.या घटनेचा तालुका वैद्यकीय संघटनेने निषेध व्यक्त करत आज बंद पुकारला आहे.

डॉ.म्हस्के यांना मारहाण झाल्याचे समजताच पाथर्डी व तिसगाव येथील डॉ.भगवान दराडे,डॉ.स्वागत ससाणे,डॉ.महेश बारगजे,डॉ.प्रताप वाघ,डॉ.अतुल बांगर,डॉ.अच्युत चितळे,डॉ.धनंजय लवांडे,डॉ. सलमान शेख,डॉ.संदीप भाबड,डॉ.सुरेश आव्हाड,डॉ.विनोद गर्जे,डॉ.बाळकृष्ण मरकड,डॉ.एस.के.टापरे,डॉ.आदी डॉक्टर उपजिल्हा रुग्णालयात आले व त्यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला. या घटनेचा निषेध म्हणून आज तालुक्यातील सर्व डॉक्टर्स आपला व्यवसाय बंद ठेवुन निषेध व्यक्त केला

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular