Homeशहरडॉ.निलेश म्हस्के यांना मारहाण करणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाई करावी आय एम ए...

डॉ.निलेश म्हस्के यांना मारहाण करणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाई करावी आय एम ए ची मागणी

advertisement

अहमदनगर दि .१० एप्रिल
पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील एका डॉक्टरला मारहाण करण्यात आलीय शुक्रवारी द्दुपारी एक वाजण्याच्या सुमारास तिसगाव येथील स्त्रीरोग तज्ञ डॉ.निलेश म्हस्के यांना पाच ते सहा अज्ञात तरुणांनी त्यांच्या हॉस्पिटल मध्ये येऊन मारहाण केल्याची घटना घडली आठ एप्रिल रोजी घडली आसुन या घटनेमुळे तालुक्यातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली होती या घटनेचा तालुका वैद्यकीय संघटनेने निषेध व्यक्त करत शनिवारी बंद पुकारला होता.

रविवारी अहमदनगर येथे इंडियन मेडिकल असोसिएशने डॉ.निलेश म्हसे यांच्यावर हल्ला करणाऱ्या पेशंटच्या नातेवाईकांवर खुनाचा प्रयत्न,बेकायदा जमाव करून
शारीरिक इजा पोहोचवणे,एपिडेमिक डिसिस (आमेण्डमेट ) ऑर्डिरोन्स 2020 अमेण्डमेंट टु सेक्शन 3 या कायद्यांच्या अंतर्ग गुन्हे दाखल करू तातडीने अटक करावी अशी मागणी एका पत्रकार परिषदेत केली आहे.

मागील दहा दिवसांपूर्वी डॉ. म्हस्के यांच्या दवाखान्यात एका महिलेची प्रसूती नंतर अतिरक्तस्राव झाल्याने उपचार सुरू असताना मृत्यू झाला होता त्या नंतर त्या महिलेच्या दहाव्या दिवशी मृत महिलेच्या माहेरच्या लोकानी डॉ . म्हस्के यांच्या दवाखान्यात येऊन डॉक्टरांना व कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केली असल्याचा आरोप आय एम ए च्या पदाधिकाऱ्यांनी केलाय

या पत्रकार परिषदेला डॉ.सतीश सोनवणे, डॉ.निसार शेख,डॉ. नरेंद्र वानखेडे उपस्थित होते.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular