अहमदनगर दि. १३ डिसेंबर
पुणे, नाशिक, अहमदनगर, संगमनेर, कोपरगांव, शिर्डी, राहाता, व लोणी परिसरामधून महिलांच्या गळ्यातील दागिणे हिसकावणारा व मागिल चार वर्षापासुन फरार असलेला सराईत आरोपी राजेंद्र ऊर्फ पप्पु भिमा
चव्हाण (घिसाडी),याला जेरबंद करण्यातस्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी अहमदनगर जिल्ह्यातील फरार
व पाहिजे आरोपीचा शोध घेवुन गुन्हेगारांविरुध्द कारवाई करण्याच्या सुचना व आदेश दिले होते.त्या नुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमून फरार आणि आरोपींचा शोध घेण्यास सांगितले.
सदर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोसई/सोपान गोरे, सफौ/राजेंद्र वाघ, सफौ/संजय खंडागळे, पोहेकॉ/बापु फोलाने, पोना/भिमराज खर्से, पोना/देवेंद्र शेलार व चापोहेकॉ/ उमाकांत गावडे यांच्या पथकाला श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथे एक फरार आरोपी येणार असल्याची माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने श्रीरामपूर परिसरामध्ये जावुन मिळालेल्या माहितीवरुन आरोपीचे ठावठिकाणा बाबत शोध घेवुन आरोपी राजेंद्र ऊर्फ पप्पु भिमा चव्हाण (घिसाडी), वय २६, रा. बेलापुर, ता. श्रीरामपूर यास शिताफीने ताब्यात घेवुन लोणी पोलीस स्टेशन येथे हजर केले लोणी पोलीस ठाण्यात त्याच्यावर मंगळसूत्र चोरीचा गुन्हा दाखल आहे तर या आरोपीवर खुन, दरोड्याची तयारी, जबरी चोरी, चोरी व आर्म अॅक्ट असे एकुण १७ गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई विशेष पोलीस उपमहानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील पोलीस अधीक्षक मनोज पाटील अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर दिपाली काळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
राजेंद्र ऊर्फ पप्पु भिमा चव्हाण (घिसाडी) याच्यावर दाखल असलेले गुन्हे
वावी, जिल्हा नाशिक | गु.र.नं. ५८/२०१० भादविक ३९९, ४०२
| इंदीरा नगर पोलीस स्टेशन, जिल्हा | गु.र.नं. २११/२०१० भादविक ३०२, २०१, १२० (ब), ३६४,
नाशिक
३९९, ४०२, ४००
तोफखानापोलीस स्टेशन | गु.र.नं. १२८/२०१३ भादविक ३९२, ३४
| श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन | गु.र.नं. ३७४/२०१५ भादविक ३९२, ३४
| श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन | गु.र.नं. २३४/२०१५ भादविक ३९२
| पुणे रेल्वे पोलीस स्टेशन
| गु.र.नं. २५३/२०१५ भादविक ३७९
| कोपरगांव तालुका पोलीस स्टेशन | गु.र.नं. १०३/२०१६ भादविक ३९२, ३४
| शिर्डी पोलीस स्टेशन | गु.र.नं. १४/२०१७ भादविक ३९२, ३४
| शिर्डी पोलीस स्टेशन | गु.र.नं. १९/२०१७ भादविक ३९२, ३४
| राहाता पोलीस स्टेशन
| गु.र.नं. ०७/२०१७ भादविक ३९२, ३४
| संगमनेर शहर पोलीस स्टेशन | गु.र.नं. ३७/२०१७ भादविक ३९२, ३४
संगमनेर शहर पोलीस स्टेशन | गु.र.नं. ४७/२०१७ भादविक ३९२, ३४
| श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन | गु.र.नं. ९३/२०१७ भादविक ३९२, ३४
| श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन | गु.र.नं. २९९/२०१८ आर्म अॅक्ट ३/२५
| श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन | गु.र.नं. २४२/२०२० आर्म अॅक्ट ३/२५, ७
| श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन
| गु.र.नं. ४२५/२०१९ मपोकाक १२२