Homeशहरतरुण पिढीला बरबादी कडे ढकलणाऱ्या आयपील विरोधात पोलिसांकडे तक्रार करा

तरुण पिढीला बरबादी कडे ढकलणाऱ्या आयपील विरोधात पोलिसांकडे तक्रार करा

advertisement

अहमदनगर दि.४ एप्रिल

आयपीएल सिजन सुरू झाला आणि पहिल्याच टप्प्यात आशा टॉकीजच्या ठेप्यावर पन्नास लाखाचा हंटर सुर्याने मारायचा कट केला मात्र हा हंटर तीन लाखाल बसला त्या मुळे महाराज नाराज झाले असले तरी धीरूभाईच्या हंटर नंतर सत्तर हजरांचे पाकीट आशा टॉकीज ठेप्यावर सर्वांनी सुरू केले आहे.

तर दुसरीकडे पर्वताच्या सावली खाली बिंगोसह आयपीएलचा सिजन जोरात असून त्यामुळे सर्व संनतुष्ट झाले आहेत पर्वताची पाळेमुळे थेट सावेडी पर्यंत आले असून सावेडी साठी सुमितभाई काम करत असून जॅकीभाई शहराची कमान सांभाळत असल्याने आयपीएल सिजनची मजा सर्वच घेत आहेत यात खाजगी सावकार मागे नसून गाड्या,मोबाईल, सोन, तारण ठेऊन लगेच पैसे उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करून देण्यात येत आहे.

विशेष म्हणजे हे सर्व खुलेआम चालू आहे आणि या गोष्टी सर्व प्रशासनाला माहीत असताना सर्वच हद्दी डोळेझाक  का करत आहेत हे समजायला मार्ग नाही. सावेडीच्या ड्रॉशी ने तर सर्वना अवतान देऊन बोलून घेतले होते त्यामुळे त्याच्याकडून सर्वांनीच काळी पट्टी बांधून घेतली आहे.

तरुण पिढी बरबाद करण्याचे कारण ठरणाऱ्या बिंगो आणि आयपील सट्टा सुरू ठेऊन आपणच पुढील पिढीला यात ढकलतो आहे याला कुठे तरी चाप लावणे गरजेचे असल्याने कुठे बेकायदेशीर जमीन बाळकवणे, बिंगो आयपील सट्टेबाजी किंवा समाजविघातक तरुण पिढीला बरबाद करतील आशा प्रवृत्तीच्या विरोधात जागृत नागतिकानी रोडवर उतरायला हवं त्यासाठी पोलीस प्रधासनाला सहकार्य करायला हवे आणि असे कृत्य करणाऱ्या लोकांच्या तक्रारी पोलीस ठाण्यात अथवा पोलीस कंट्रोल रूम अथवा 112 या नंबरवर करायला हव्यात या ठिकाणी फोन केल्यावर नावे गुप्त ठेवण्यात येत असल्याने नागरिकांनी घाबरू नये

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular