Homeक्राईमतहसीलदारांच्या बैठकीत घुसून अरेरावी करणाऱ्या आरोपींना अटक तोफखाना पोलिसांची कारवाई

तहसीलदारांच्या बैठकीत घुसून अरेरावी करणाऱ्या आरोपींना अटक तोफखाना पोलिसांची कारवाई

advertisement

अहमदनगर दि. ६ फेब्रुवारी
नगर तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदार आणि कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालून धिंगाणा करणाऱ्या दोन आरोपींना तोफखाना पोलिसांनी दौंड रोड वरील एका हॉटेल मधून ताब्यात घेतले आहे १८ जानेवारी रोजी नगर तहसील कार्यलयात तहसीलदार आणि तलाठी यांची बैठक सुरू असताना या बैठकी मध्ये घुसून तुम्ही भ्रष्टाचारी आहात तुम्हाला भ्रष्टाचाराची लागन झाली आहे. बैठकिस बसलेले तलाठी व मंडल अधिकारी यांना बघुन घेतो अश्या धमक्या देऊन तहसीलदारांना अरेरावी करण्याची घटना घडली होती.

या बाबत १८ जानेवारीला सचिन एकनाथ एकाडे आणि शाम नामदेव कोके यांच्या विरुद्ध तोफखाना पोलीस स्टेशन गु.र.नं. 1 40/2022 भा.द.वि. कलम 353, 186, 504, 506,509, 34 प्रमाणे दाखल करण्यात आला होता. या घटनेचा तपास तोफखाना पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होता.

आरोपींनी गुन्हा केल्या नंतर आपले मोबाईल बंद करून फरार झाले होते त्यामुळे आरोपींना शोधणे कठीण जात होते याबाबत पोलिसांनी मोबाईल सेलची मदत घेऊन आरोपींचा ठावठिकाणा शोधला आरोपींनी जुने सिम कार्ड फेकून देऊन नवीन सिम कार्ड वापरत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपास करून या प्रकरणातील आरोपी सचिन एकाडे आणि श्याम कोके यांना दौंड रोडवरील खंडाळा शिवार येथील हॉटेल अदिती येथून ताब्यात घेण्यात आले आहे.

या प्रकरणाचा तपास जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ आगरवाल तसेच शहर उपविभागीय अधिकारी अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली तुफान पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक जुबेर मुजावर पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके महिला पोलिस उपनिरीक्षक शुभांगी मोरे यांच्या मार्गदर्शनाने सुचने नुसार पोहेकॉ/ दत्तात्रय जपे, पोना/ अविनाश वाकचौरे,पोना/ वसीम पठाण, पोना/ अहमद इनामदार,मोबाईल सेलचेपोकॉ/ प्रशांत राठोड, धिरज खंडागळे, पोकॉ/ शिरीष तरटे,पोकॉ/ सचिन जगताप, पोकॉ/चेतन मोहिते, या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केला आहे

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular