अहमदनगर दि.२ मार्च
आज गुढीपाडवा पडावा अर्थात हिंदू नववर्ष आरंभ होणारा दिवस आजच्या दिवशी वाईट गोष्टी सोडून देऊ या आणि नवीन वर्षात नवीन संकल्प घेऊन पुढे जाऊयात आणि अपप्रवृत्तीचा नायनाट करूया असा संकल्प सर्वांनीच करायला हवा मात्र ताबा प्रवृत्ती काही कमी व्हायला तयार नाही ती वाढत चालली आहे.
ताबा सदर चालू केल्या पासून यात गुंड आहेत अस प्रथमदर्शनी सर्वानाच वाटत होते मात्र त्यांच्या मागे अनेक मातब्बर पैसेवाले लोक उभे आहेत हे पुढे आले आहे जमीनीला सोन्या पेक्षा जास्त भाव आल्याने ही ताबा प्रवृत्ती वाढत चालली आहे.
मागील भागात ज्या सातबारा शोध टोळी आम्ही उल्लेख केला होता त्या टोळीने नगर मनमाड रोड शेजारी असणाऱ्या एका चांगल्या उच्चभ्रू वस्ती मध्ये असणाऱ्या एक जुन्या इमारती वर ताबा मारण्याचा प्रयत्न सुरू केला आहे विशेष म्हणजे या इमारतीची नोंदच महापालिका दप्तरी नाही आणि इमारत खूप जुनी असून त्याचा मूळ मालक अनेक वर्षा पासून नगरमध्ये वास्तव्यास नाही त्याने इमारतीचा काही भाग तेव्हा विकला होता मात्र खरेदी दिली नाही आता या जमिनीची किंमत करोडो रुपये झाली असल्याने या मालकाचा शोध घेऊन त्याच्या बरोबर काही रकमेचा सौदा करून काही टोळ्या या जुन्या इमारती मधील लोकांना बाहेर काढून इमारत ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
विशेष म्हणजे आशा अनेक इमारती आहेत ज्या महापालिका दप्तरी त्यांची नोंदच नाही तर काही उंच इमारती आहेत त्यांना महापालिका प्रशासन किरकोळ कर आकारत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे.
अमूल बटर ने तर कहरच केला असून एकाला त्याने नगरची जमीन दाखवून शहराबाहेरची जमीनीचे साठेखत करून दिले मात्र पैसे दिल्या नंतर ही बाब लक्षात आल्याने सध्या ‘तेरी भी चूप मेरी भी चूप असं चाललंय पोलिसात गेलो कोर्ट काचेरी सुरू होईल आणि पैसे गुंतून पडतील म्हणून सध्या राजकीय स्तरावर प्रकरण मिटवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.