अहमदनगर दि .१४ एप्रिल
युवा सेना प्रमुख विक्रम अनिल राठोड यांना राम नवमी मिरवणुकीच्या दरम्यान धक्का बुक्की करत तुझा काटा काढतो अशी धमकी दिल्याची तक्रार पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना भेटून दिली होती त्या नंतर बुधवारी त्यांनी समक्ष पोलीस ठाण्यात जाऊन गजेंद्र सैंदर याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
विक्रम राठोड हे रामनवमीच्या दिवशी नेताजी सुभाष चौकात रामनवमी मिरवणुकीच्या स्वागतासाठी उभे होते त्यावेळी गजेंद्र सैंदर याने राठोड यांना धक्का दिला तसेच
‘तू इकडे ये, मिरवणुकीत तुझा काटाच काढतो’, असा दम दिला असल्याची फिर्याद विक्रम राठोड यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिली आहे.





