Homeक्राईमतोफखाना हद्दीत धूम स्टाईल मंगळसूत्र चोरी भर दुपारी चोरी करून चोरट्यांचे पोलिसांना...

तोफखाना हद्दीत धूम स्टाईल मंगळसूत्र चोरी भर दुपारी चोरी करून चोरट्यांचे पोलिसांना आव्हानच

advertisement

अहमदनगर दि.१६जानेवारी
अहमदनगर शहरातील उपनगरामध्ये धूम स्टाइल चोरांचे प्रमाण वाढले असून मध्यंतरी पोलिसांनी काही टोळ्याजेरबंद केल्या होत्या मात्र रोजच नवनवीन टोळ्या निर्माण होत असल्याने पोलिसांना या चोऱ्या रोखणे मोठे आव्हान ठरले आहे.

सावेडी उपनगरातील गंगा उद्यान मागील समता नगर मध्ये एका महिलेचे मंगळसूत्र चोरल्याची घटना दुपारी साडेचारच्या दरम्यान घडली असून ही महिला आपल्या मुलांना क्लासला सोडून घरी येत असताना मागून आलेल्या लाल रंगाच्या आपाची गाडीवरील दोन चोरट्यांनी मंगळसूत्र हिसका मारून चोरून नेले आहे.

या घटनेनंतर तोफखाना पोलिस स्टेशनचे सर्वच वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी धाव घेत काही सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे सीसीटीव्ही फुटेजमध्ये या चोरट्यांचा चेहरा स्पष्ट दिसत असल्याने लवकरच हे चोरटे जेरबंद होतील असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

लाल रंगाची विना नंबरची अपाची गाडी तसेच दुचाकी चालणारा चा पांढरा शर्ट तर मागे बसलेल्या माणसाच्या अंगावर फिक्कट भगव्या रंगाचे जर्किन इसम कुठे आढळल्यास तोफखाना पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन तोफखाना पोलिसांनी केले आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular