अहमदनगर दि.१० फेब्रुवारी
अहमदनगर शहरातील ते सरकारी कार्यालय नेहमीच चर्चेत असते लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी नागरीक नेहमीच या ठिकाणी येत असतात.
एका कर्मचाऱ्याला लाच घेताना रंगेहात पकडल्या पासून हे सरकारी कार्यालय चांगलेच चर्चेत आहे.या कार्यातील सर्व कर्मचाऱ्यांसाठी एक व्हाट्सअप ग्रुप बनवण्यात आला होता यामध्ये विचारांच्या देवाण-घेवाण आणि कार्यालयातील महत्त्वाच्या कामकाजाबाबत माहिती पुरवली जात होती मात्र या व्हाट्सअप ग्रुप वर अत्यंत लज्जास्पद अशी पोस्ट एका कर्मचार्याने टाकल्याने एकच खळबळ उडाली आहे या ग्रुप मध्ये कार्यालयातील महिलाही असल्याने महिलांनी तातडीने हा ग्रुप सोडला.
या पोस्ट बाबत कायदेशीर कारवाई पर्यंत प्रकरण पोहचल होतं मात्र याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्याला समज देण्यात येऊन प्रकरण शांत करण्यात आल्याचं समजतंय
त्यामुळे सोशल मीडियावर वावरताना प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक हाताळणे गरजेचे आहे. अन्यथा आपली छोटी चूक चांगलीच महागात पडू शकते आणि जेलची हवा खायला पाठवू शकते.