Homeक्राईमत्या पठयाने बिंगोत लाखो रुपये घातले तर दुसऱ्याने केली अय्याशी... बनावट सोने...

त्या पठयाने बिंगोत लाखो रुपये घातले तर दुसऱ्याने केली अय्याशी… बनावट सोने तारण प्रकरणातील त्या दोघांनी सर्वसामान्य लोकांना फसवून केली जीवाची मुंबई

advertisement

अहमदनगर दि.30 सप्टेंबर

अहमदनगर शहरातील शहर सहकारी बँक आणि श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी मध्ये सोने तारण विभागात बनावट सोने ठेवून कोट्यावधी रुपयांचे कर्ज प्रकरण केल्याचं उघडकीस आले आहे. या प्रकरणात जवळपास 100 च्या आसपास आरोपी झाले आहेत.मात्र यातील मुख्य आरोपी म्हणजे दोन्ही बँकेचा गोल्डव्हॅल्यूअर अजय कपाले,त्याचे साथीदार सुनील आळकुटे श्रीतेश रमेश पानपाटील रा.आलमगिर भिंगार , संदीप सिताराम कदम,सचिन जाधव, अशांनी मिळून गोरगरीब नागरिकांना गरजेनुसार पैसे देऊन आपले सोने त्यांच्या नावे घेऊन कर्ज काढून पैसे देतो असे सांगून बनावट सोने सोने तारण ठेवून लाखो रुपयांची कर्ज काढले होते. कोतवाली पोलिसांनी उघड केलेल्या या गुन्ह्यात आता अनेक नवनवीन गोष्टी समोर येऊ लागले आहेत ही टोळी अत्यंत नियोजनबद्ध काम करत होती अत्यंत गरजू लोकांना शोधून त्यांच्या नावावर बनावट सोने ठेवून त्यांना थोडेफार पैशात गुंडाळून बाकीचे पैसे हे टोळी अय्याशी करण्यासाठी घेत असल्याचे समोर आले आहे.


या प्रकरणातील भिंगार येथील एका म्होरक्याने या बनावट सोने तारण कर्ज प्रकरणातून आलेल्या पैशातून ऑनलाईन बिंगो जुगार खेळून काही तासात 90 लाखांचा चुराडा केला होता. काही जणांनी ऑनलाइन सट्टा आणि मुंबईला जाऊन जीवाची मुंबई करून लाखो रुपये तिच्यावर उधळ्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

याच बरोबर एका कर्जदाराला तर एवढा मोठा धक्का बसला की जेव्हा पोलीस त्याला शोधत त्याच्या पर्यंत पोहचले आणि त्याला त्याचे नाव बनावट सोने प्रकरणात आल्याचं सांगितलं तेव्हा त्याला काही वेळ सुधारलेच नाही अत्यंत गरीब असलेला एक पान टपरी चालक अपघात झाल्यामुळे काही दिवस दवाखान्यात ऍडमिट होता घरची परिस्थिती अत्यंत हालाकीची होती उपचारा नंतर त्याला डॉक्टरांनी पुन्हा एकदा डोक्याचा एम आर आय काढायला सांगितले होते. मात्र त्याच्याकडे पैसे नसल्याने त्याने आळकुटे यास पाच हजार रुपये उसने मागितले होते. आळकुटे याने त्या टपरी चालकाला माझ्याकडे पैसे नाहीत मात्र सोने आहेत मलाही पैशाची गरज आहे. माझ्याकडे सोने आहे ते सोनेतारण करून कर्ज काढू आणि आपली गरज भागू असे म्हणून त्या पान टपरी चालकाची सर्व कागदपत्रे घेऊन बँकेत त्याच्या नावावर सोनेतारण ठेवले मात्र संध्याकाळी पाच हजार रुपये घेऊन येतो असे म्हणून तो जो गायब झाला तो पुन्हा दिसलाच नाही मात्र टपरी चालकाला याची कल्पनाही नव्हती की त्याच्या नावावर अळकुटे यांनी दोन लाख 80 हजार रुपयांचे कर्ज प्रकरण केले आहे. त्या टपरी चालकाला कधीही बँकेची नोटीस आली नाही. मात्र जेव्हा हे प्रकरण उघडकीस आलं आणि पोलीस त्याच्या घरी धडकले तेव्हा त्याला एक धक्का बसला कारण पाच हजार रुपये घेऊन येतो म्हणून आळकुटे जो फरार झाला होता तो त्याला अध्यपही भेटला नव्हता
असे अनेक गरीब जनतेला फसवणारी टोळी सध्या जेरबंद झाली आहे. मात्र आणखीन काही धक्कादायक गोष्टी समोर येण्याची शक्यता आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular