Homeजिल्हादहशतवाद्यांना मदत करणाऱ्या नवाब मलिकांनी त्वरित राजीनामा द्यावा भाजपची मागणी, बुधवारी...

दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या नवाब मलिकांनी त्वरित राजीनामा द्यावा भाजपची मागणी, बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करणार नवाब मलिक यांच्या पुतळ्याचे दहन शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे यांची माहिती

advertisement

अहमदनगर दि १ मार्च
महाराष्ट्रातील महाविकास आघाडीले राष्ट्रवादी पक्षाले मंत्री नबाब मलिक यांना ईडी अर्थात प्रवर्तन संचनालयाने अटक केली आहे. या प्रकरणाली चौकशी केंद्रीय यंत्रणांकडून काही दिवसांपासून सुरु होती.मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीकडून  ईडीने कारागृहात जाऊन जबाब घेतला आहे. एनआयएच्या कारवाईत एक मोठी लिंक मिळाली असून ज्यातून रियल इस्टेटचे व्यवहार मनी लॉंड्रीग माध्यमातून होत असल्याचं समोर आले आहे.

नवाब मलिक यांनी अंडरवर्ल्डशी संबंधित माणसाकडून जमीन घेतली असून दहशतवादी दाऊद इब्राहिम यांची बहीण हसीना पारकर सौदा करत होती यात मिळालेला पैसे दहशतवादी कारवायांना पुरवला जात असल्याचे सिद्ध झाले आहे हा प्रकार अत्यंत गंभीर असून आशा व्यक्तीला मंत्री मंडळात न ठेवता त्यांचा राजीनामा घ्यावा अथवा नबाब मलिक यांनी स्वतःहुन राजीनामा द्यावा अशी मागणी शहर भाजपच्या वतीने घेतलेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आली आहे.

मंत्री नबाब मलिक यांचा राजीनामा न घेतल्यास भारतीय जनता पार्टी तीव्र आंदोलन करणार असून बुधवारी सकाळी भारतीय जनता पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर आंदोलन करण्यात येणार असून मंत्री नबाब मलिक यांच्या पुतळ्याचे दहन करणारा असल्याची माहिती शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे यांनी दिली आहे.

या पत्रकार परिषदेमध्ये संघटन सरचिटणीस विवेक नाईक, नगरसेवक प्रदीप परदेशी, भारतीय जनता पार्टी चे उपाध्यक्ष संतोष गांधी, माजी नगरसेविका संगीता खरमाळे, केडगाव मंडलअध्यक्ष पंकज जहागीरदार ,भिंगार मंडल अध्यक्ष वसंत राठोड ,भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस तुषार पोटे, महेश नामदेव, विधानसभा प्रमुख शशांक कुलकर्णी, ओबीसी मोर्चा प्रमुख ज्ञानेश्वर काळे, माजी सैनिक आघाडीचे नवनाथ टिंमकरे, शरद बारस्कर शिवाजी दहीहंडे, किशोर उदोरे,लक्ष्मीकांत तिवारी, आदि उपस्थित होते.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular