मुंबई दि २६, फेब्रुवारी
केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे सुपुत्र नितेश राणे पुन्हा एकदा अडचणीत आले असून दोघा पिता पुत्रांवर मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे
दिशा सालीयान प्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काही वक्तव्य केले होते दिशा सालीयन वर लैंगिक अत्याचार झाल्याचं राणे पिता पुत्रांनी केला होता आरोप केला होता.
राणे पिता पुत्रांच्या या आरोपा नंतर दिशा सालीयान यांच्या आई आणि वडिलांनी राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली होती या बाबत महिला आयोगाने पोलिसांकडे दिशा सालीयान पोस्ट मॉर्टम आहवाल मागितला होता हा आहवाल महिला आयोग कडे आला असून याअहवालात दिशा सालीयान पोस्ट मॉर्टम मध्ये
तिच्यावर लैंगिक अत्याचार झाला नसल्याचे आणि
ती गरोदर नव्हती असे ही स्पष्ट करण्यात आले आहे.
त्यामुळे आता राणे पिता पुत्रांवर कायदेशीर कारवाई साठी मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.