HomeUncategorizedदेर है पर न्याय जरूर है ..अन्याय होत असेल तर शांत राहू...

देर है पर न्याय जरूर है ..अन्याय होत असेल तर शांत राहू नका कायद्याची मदत जरूर घ्या, हाताखालच्या तरुणांच्या अंगावर चढते गुन्ह्यांची जंत्री म्होरक्या मात्र बंगल्यात खात बसतो संत्री, सातबारा सर्च टोळक्याने चांगलाच घातलाय धुमाकूळ!

advertisement

अहमदनगर दि २४ मार्च – (सुशील थोरात)

ताबा हा प्रकार नगरला नवीन नाही खूप वर्षांपासून नगर शहरासह उनगरात ताबा मारण्याचे प्रकार सुरू होते मात्र आजकाल त्याचा प्रकार जास्तच वाढत चालला आहे त्याचे कारण म्हणजे बेरोजगारी, ईझी मनी, रात्रीतून श्रीमंत होण्याची ईच्छा आणि चुकीची सांगत,राजकीय पाठबळ, यामुळे हा प्रकार वाढत चालला आहे.

आजकाल मिशी न फुटलेले तरुण या सहजसोप्या ताबा मारण्याच्या कामांकडे वळाले आहेत मात्र त्यांच्या कुटुंबीयांनी सुद्धा हे तपासले पाहिजे की आपला मुलगा महागडे मोबाईल, गाडया,सोन ,आणतोय कुठून सुरुवातीला खुप छान वाटत असलं तरी कायदा एक ना एक दिवस आशा बेकायदेशीर कामांना आळा घालतोच आणि तेव्हा सर्व संपलेला असतं भले भले गुंड आज जेलमध्ये आणि तडीपार झालेले आहेत हे विसरून चालणार नाही.

ताबा प्रकरणी काही ठराविक लोक तरुणांना गरजवंत तरुणांना हेरून त्यांच्याकडून ही कामे करून घेततत आणि त्यांच्या माध्यमातून लाखो रुपयांची संपत्ती तरुणांचा म्होरक्या कमवत असतो मात्र काम करणाऱ्या तरुणांना त्याचा वाटा अत्यंत छोटा मिळतो मात्र कमी श्रमात मिळालेल्या पैशाचे मोल नसते त्यामुळे हे तरुण या मोहजालात अडकत जातात त्याच वेळी त्यांचे म्होरके ताब्याच्या सुपाऱ्या वाजवून करोडो रुपयांची संपत्ती कमावत बंगल्याचे इमले बांधत असतात आणि काम करणाऱ्या तरुणांच्या नावावर गुन्ह्यांची जंत्री वाढत जाते.

बांधकाम सुरू असताना काही ठराविक लोकांना त्या ठिकाणी घरात घुसवून पैसे कमावण्याचा धंदाही नगर शहरात सुरू होता आणि सुरू आहे. याबाबत मधल्या काळात नगर शहरात चांगलीच चर्चा झाली होती यात अनेक मातब्बर लोकांचे नावही चर्चेत आले होते अनेक लोकांना याचा त्रासही सहन करावा लागत होता मात्र शेवटी आर्थिक तडजोडी नंतरच हे प्रकरण मिटले आहेत.

कोर्ट कचेरी पोलीस स्टेशन या भानगडी नको म्हणून सामान्य नागरिक व्यापारी किंवा पांढरपेशे व्यवसाय करणारे लोक या भानगडीत पडत नाहीत ऱ्यमुळे ताबा गुंडांची दहशद वाढत आहे.

बरं या ताबा गुंडांची दहशत एवढी कशी झाली तर याला काही आपल्या मधील काही लोक जबाबदार आहेत एकमेकांची जिरवायची किंवा भाऊबंदकी वादातून काटा काढायचा यामुळेच गुंडांना बरोबर घेऊन ताबा मारण्याचे प्रकारही शहरात घडत आहेत तसेच थकलेले पैसे मिळत नसल्याने अखेर गुंडांच्या मदतीने पैसे वसूल करण्याचे प्रकार ही नगर शहरात घडत असल्याने एक प्रकारे गुंडांना आपल्यातील काही लोक सामील असल्याने ताबा गुंडांची साखळी वाढत चालली आहे.

नगर शहरात कमी होते म्हणून काही ताबा गुंड आता नगर शहराच्या आसपासच्या गावातून येऊन नगर शहरात ताबे मारण्यासाठी पुढे येऊ लागले आहेत नगर शहरात एक काळा रंग असलेली गाडी आणि एक लाल रंगाची गाडी दिवसभर शहरातील उपनगरांमध्ये फिरत असते आणि कुठे मोकळी जागा भेटेल किंवा वादग्रस्त काय असेल अशा जागांचा सर्वे या गाड्यातून होत असतो आणि वेळेनुसार ताब्याचा काम ते योग्य पद्धतीने बजावत असतात.

आज-काल सर्व काही ऑनलाईन होत असल्याने सातबारा उतारा वरील नावे सर्च करून त्या इसमाची माहिती घेऊन ते उताऱ्यावरील मालक जर नगर शहरात वास्तव्यास नसतील आणि त्यांची जागा नगर शहरात असेल तर अशा ठिकाणी ही अतिक्रमण करून पैसे उकळण्याचे काम मोठ्या प्रमाणावर होत आहे अशी एक टोळी सध्या नगर शहरात कार्यरत असून त्यांचे काम फक्त सातबारा उतारा सर्च करून त्यावरील मालकांची नावे आणि त्यांचे पत्ते शोधून काढणे आणि ते शहराबाहेर असतील तर त्या ठिकाणी ताबा मारणे अशी टोळीही मोठ्या प्रमाणावर काम करत आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular