शिर्डी –
शिर्डी नगरपंचायतच्या निवडणूकीवर ग्रामस्थ बहिष्कार टाकणार असल्याची बातमी हाती येत असून
शिर्डी नगरपंचायत रद्द करून नगरपरिषद करावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे. शिर्डी नगरपंचायतीची नुकतीच निवडणूक जाहीर झाली असून २१ डिसेंबरला निवडणूक होणार आहे. मात्र या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची तयारी शिर्डी ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत आज शिर्डी येथे महत्त्वपूर्ण बैठक झाली. त्यामध्ये अनेक ग्रामस्थांनी या निवडणुकीवर बहिष्कार टाकून शिर्डी नगरपरिषद करण्यासाठी सर्वपक्षीय दबाव सरकारवर टाकावा अशी एकमुखी मागणी केली आहे. कोणत्याही पक्षाच्या उमेदवाराने निवडणूक न लढवता सरकारवर दबाव आणावा हीच वेळ आहे जेणेकरून सरकार वर दबाव येऊन सरकार आपल्या मागण्या मान्य करतील असा निर्णय या बैठकीत करण्यात आला. त्यामुळे आता ग्रामस्थ या निर्णयावर शेवटपर्यंत ठाम राहतात का? हेच पहाने आता उचित ठरेल. तसेच विविध राजकीय पक्षांच्या भूमिकाही महत्त्वाच्या ठरणार असून ऐनवेळेस राजकीय पक्ष काय भूमिका घेतात हे आता येणारा काळ ठरवेल त्यामुळे शिर्डी नगर पंचायतीची निवडणूक चांगलीच गाजणार आहे असे दिसते