दिल्ली २१ मार्च
कश्मीर फाइल्स या चित्रपटावरून अनेक मतप्रवाह वेगवेगळ्या स्थारतून व्यक्त होत आहेत काही लोकांनी या चित्रपटाचा विरोध केला आहे तर काही लोक चित्रपटाच्या समर्था मध्ये उतरले आहेत राजकारणामध्ये सुद्धा या चित्रपटाबद्दल अनेक मतप्रवाह आहेत प्रत्येक पक्षाने आपापली वेगळी मते या चित्रपटाबद्दल व्यक्त केले आहेत त्याचप्रमाणे चित्रपट सृष्टीतील काही निर्माते आणि अभिनेत्यांनी सुद्धा याबाबत आपली वेगवेगळे मते मांडली आहेत.
सोमवारी एका कार्यक्रमात द कश्मीर फाईल्स चित्रपटा बद्दल प्रसिद्ध चित्रपट अभिनेता आमिर खान याने या चित्रपटाची प्रशंसा केली आहे तो एक कार्यक्रमात बोलताना म्हणाला
हर हिंदुस्तानी देखे कश्मीर फाइल्स, मैं द काश्मीर फाईल्स जरूर देखुंगा हर हिंदुस्तानी अत्याचार को याद करे,कश्मीरी पंडितोके साथ जो हुवा वो बडी दुख की बात है अशा शब्दात त्यांनी चित्रपटाचे प्रशंसा करत चित्रपट पाहण्याचं प्रेक्षकांना आव्हान केला आहे चित्रपटाची सफलता पाहून मी खूष होत आहे असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले
त्यामुळे आमीर खान पुन्हा एकदा चर्चेत आला असून सोशल मीडियावर आता आमिर खान बाबत सुद्धा अनेक मॅसेज फिरत आहेत अनेक नेटकाऱ्यांनी त्याला टीकेचे लक्ष केले आहे तर अनेकांनी त्याला आता देशभक्त म्हणून बोलायला सुरुवात केली आहे.





