पुणे –
पुण्यामधून एक धक्कादायक बातमी समोर येत असून लहान मुलांना ओमिक्रॉनची लागण झाली असल्याच्या माहिती समोर येत आहे त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे पिंपरी-चिंचवडमध्ये सापडलेले सहाही जण नायजेरियातून आले होते. 24 नोव्हेंबर रोजी नायजेरियातील लेगॉस शहरातून आपल्या भावाला भेटण्यासाठी एक 44 वर्षाची महिला आली होती. तिच्या सोबत तिच्या दोन मुलीही होत्या. पिंपरी चिंचवडमध्ये राहणारा तिचा भाऊ, ती आणि तिच्या दोन्ही मुलींसह एकूण सहा जणांचे नमुने चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले होते. त्याचा अहवाल आला असून त्यात या सहाही जणांना लागण झाल्याचं आढळून आलं आहे. तसेच पुण्यातील एका 47 वर्षीय व्यक्तीलाही ओमिक्रॉनची लागण झाली आहे.
- राज्यातील जनतेला अॅलर्ट करणारी बातमी आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये सहा तर पुण्यात एकाला ओमिक्रॉनची लागण झाली आहे. त्यामुळे राज्यातील ओमिक्रॉन बाधितांची संख्या 8 झाली आहे.