मुंबई-
मुंबई-अहमदाबाद मार्गावर आज एक भीषण घटना घडली एक त्या गवताच्या ट्रकने पेट घेतल्याने रस्त्यावरून आग धावताना चे चित्र विरारकरांनी आज पाहिलं.
मात्र ट्रक ड्रायव्हर ने प्रसंगावधान दाखवून इतर वाहनांना त्रास होऊ नये म्हणून ट्रक सुरक्षितस्थळी नेत उभा करून आग विझवण्याचे प्रयत्न केल्याने पुढील मोठा अनर्थ टळला.
या आगीमध्ये ट्रक मधील सर्व चारा जळून खाक झाला होता मात्र कोणतीही मोठी हानी झाली नाही. मात्र विरारकरांना द बर्निंग ट्रेन चित्रपटातील तो क्षण मात्र नक्की आठवला असेल त्या चित्रपटात आग लागलेली रेल्वे धावताना सर्वांनी पाहिली होती तर आज आग लागलेल्या ट्रक मुंबई-अहमदाबाद मार्गावर धावत होता.
पहा व्हिडिओ द बर्निंग ट्रक