अहमदनगर प्रतिनिधी-
अवैध बायोडिझेल विक्री प्रकरणात अनेक धक्कादायक माहिती उघडकीस येत असून या प्रकरणी कोतवाली आणि तोफखाना पोलीस तपास करत आहेत कोतवाली पोलिसांनी आत्तापर्यंत २५ आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तर तोफखाना पोलीस ठाण्यात अद्यापही तपास सुरू असून मुंबई पासून ते थेट नगर मार्गे कर्नाटक पर्यंत ही साखळी पोहोचलेले आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत ६० ते ७० कोटी रुपयांचा व्यवहार या अवैध बायोडिझेल प्रकरणात झाल्याचे समोर येत आहे. यामधील प्रमुख सूत्रधार असलेल्या शिवसेनेचे दिलीप सातपुते यांचा सहभाग आणि त्यांनी केलेले व्यवहार पाहून पोलीस चक्रवले आहेत.यात सहभागी असलेल्या आरोपींच्या खात्यावर कोटीच्या कोटी रुपयांचा व्यवहार झाल्याने प्रशासनाचा किती रुपयांचा महसूल बुडाला हे लक्षात येत आहे. आता याबाबत राज्य शासनानेही दखल घेतली असून. अवैध बायोडिझेल धंदे समूळ नष्ट करा असे आदेश गृह खात्याने दिले आहेत. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर यांनी कडक धोरण अवलंबले असून नाशिक परिक्षेत्राच्या कोणत्याही हद्दीत बायोडीझेल विक्री होणार नाही याची खबरदारी घेण्याचे आदेश परिक्षेत्रातील पोलीस अधीक्षकांना देण्यात आले आहेत.