अहमदनगर दि १७ मार्च
होळी नंतर येणारा दुसरा दिवस म्हणजे धुळवड आज अहमदनगर शहरात अनेक ठिकाणी धुलिवंदनाचा उत्साह दिसून आला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षापासून सण उत्सव साजरे करण्यावर प्रशासनाने बंदी घातली होती त्यामुळे दोन वर्षानंतर आज अनेक ठिकाणी तरुण-तरुणी धुळवडीचा आनंद घेताना दिसून आले.
विशेषता भिंगार शहरामध्ये आज डीजेच्या तालावर थिरकत तरुणांनी धुलीवंदन साजरी केली तसेच भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन आणि नगर तालुका पोलीस स्टेशन मधील कर्मचाऱ्यांनी ही धुळवडीचा आनंद घेत एकमेकांना रंग लावून हा आनंदोत्सव साजरा केला.।
कर्मचाऱ्यांच्या आनंदात भिंगार पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख आणि नगर तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वसंत सानप यांनी सहभाग घेतला होता.
24 तास ऑन ड्यूटी असलेल्या पोलिसांना क्वचितच असे आनंदाचे क्षण साजरे करायला मिळत असतात मात्र वेळात वेळ काढून अधिकाऱ्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसोबत हा आनंद उत्सव साजरा केलाय.