HomeUncategorizedधूम स्टाईलने चोरी करणाऱ्या आणि महाराष्ट्रासह केरळ,कर्नाटक, गुजरात राज्यात ३१ गुन्हे दाखल...

धूम स्टाईलने चोरी करणाऱ्या आणि महाराष्ट्रासह केरळ,कर्नाटक, गुजरात राज्यात ३१ गुन्हे दाखल असणाऱ्या सराईत चोरट्याच्या मुसक्या अवळण्यास स्थानिक गुन्हे शाखेला यश नगर शहारातील चोऱ्यांची दिली कबुली

advertisement

अहमदनगर दि .१० एप्रिल
बेसावध महिलांचे दागिने ओरबाडून गाडीवर पळून जाणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले असून या चोरट्यांनी नगर शहरातील समता नगर मधील एका महिलेचे गळ्यातील मंगळसूत्र चोरल्याची कबुली दिली आहे.पकडलेल्या चोरट्यांचा नावे कंबर रहीम मिझा वय ३५,रा. वॉर्ड नं. १, श्रीरामपूरआणि अनिल रावसाहेब चव्हाण वय २५, रा. दत्तनगर, स्टेशन रोड, ता. राहुरी असे आहेत .

१६ फेब्रुवारी ला समता नगर मधील प्राजक्ता सुरेंद्र गाडे या पायी जात असताना विना नंबर मोटार सायकलवर अज्ञात दोन लोकांनी त्यांच्या गळ्यातील ५०,०००/- रु.कि.चे दोन तोळे वजनाचे मंगळसुत्र बळजबरीने ओढुन तोडून नेले होते याबाबत प्राजक्ता गाडे यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता.

या चोरीचा तपास स्थानिक गुन्हे शाखा करत असताना एक सराईत चोरटा श्रीरामपूर येथे सोनाराकडे चोरलेले दागिने विकण्यासाठी येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे पथकाला कळली त्या नुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी पोसई सोपान गोरे, सफो भाऊसाहेब काळे, विजयकुमार वेठेकर, बाळासाहेब मुळीक, पोना विशाल दळवी, ज्ञानेश्वर
शिंदे, शंकर चौधरी, रवि सोनटक्के, पोकॉ मेघराज कोल्हे, आकाश काळे, राहुल सोळुके व पोहेकॉ संभाजी कोतकर यांच्या पथकाने सापळा लावून श्रीरामपूर ते नेवासा रोडवर कांदा मार्केट जवळ कंबर मिझा,अनिल रावसाहेब चव्हाण यांना ताब्यात घेतले.

या दोन्ही सराईत चोरट्यांकडे तापस करत असताना त्यांनी नगर घरातील समता नगर येथील चोरीची कबुली दिली या दोन्ही चोरट्यांकडून १,७०,०००/- रु.किचे सोन्याचे दागिने व अॅक्टीव्हा मोपेड असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

आरोपी कंबर रहिम मिझ हा सराईत गुन्हेगार असुन त्याच्यावर दरोडा तयारी, जबरी चोरी, चोरी व फसवणुक करणे गुन्हे नगर जिल्ह्यासह केरळ,कर्नाटक, गुजरात राज्यात -७ गुन्हे आणि महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, सोलापुर, धुळे जिल्ह्यात – २४ असे एकुण- ३१ गुन्हे दाखल आहेत.तर अनिल रावसाहेब चव्हाण याच्या विरुध्द दरोडा तयारी व फसवणुक असे २ गुन्हे दाखल आहेत.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील , अपर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि कर्मचार्यांना यांनी केली आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular