Homeक्राईमनगर तालुका तहसील कार्यालयात रणकंदन वाद थेट पोलीस स्टेशन पर्यंत

नगर तालुका तहसील कार्यालयात रणकंदन वाद थेट पोलीस स्टेशन पर्यंत

advertisement

अहमदनगर दि.१८ जनेवारी
नगर तालुका तहसील ऑफिस मध्ये आज चांगलेच रणकंदन झाले. माहिती अधिकार कार्यकर्ते कोके हे थेट तहसीलदार आणि ग्रामसेवक यांच्या बैठकी मध्ये घुसून त्यांनी तहसीलदारांना जाब विचारल्याने एकच गोंधळ उडाला. यामध्ये काही अपशब्द वापरले गेल्याने काही कर्मचारी आणि कोके यांच्यामध्ये चांगलीच झोंबाझोंबी झाली होती.

या प्रकारा नंतर सर्व कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन करत तोफखाना पोलीस स्टेशन गाठून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.तर या प्रकारानंतर कोके यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन तेथेही असाच जाब विचारण्याचा प्रयत्न केला होता.

या घटनेत परस्परविरोधी फिर्यादी दाखल होण्याची शक्यता असून तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये तहसीलदार कार्यलयात सर्व कर्मचारी ठाण मांडून असून कोके यांच्या सह काही लोकांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

कोके यांनी माहिती अधिकारातून सारस नगर भागातील गाळपेर मध्ये बांधलेल्या पक्के घरी पाडण्यासाठी पाठपुरावा केला आहे. याबाबत भिंगार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला ,असून यामध्ये महसूल अधिकाऱ्यांसह महानगरपालिकेच्या काही अधिकाऱ्यांचा समावेश आहे त्याबाबतीत कोके हे अनेक दिवसांपासून पाठपुरावा करत आहेत.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular