अहमदनगर (प्रतिनिधी)- दि १२ मार्च
नगर तालुक्यातील खांडके येथे अवैद्य दारूधंदे बंद करण्यासाठी ग्रामसभेच्या मिटिंग मध्ये 107 महिलांनी निवेदन दिले त्या महिलांच्या मागणीनुसार दारूबंदी ठराव मासिक ठराव मध्ये मंजूर केला असुन. गावामध्ये अवैद्य दारू धंदे मोठ्या प्रमाणावर चालूच आहे.
त्यामुळे हे अवैध दारूधंदे बंद करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय येथे निवेदन देण्यात आले. यावेळी सरपंच पोपट चेमटे, जन आधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे, उपसरपंच जितेंद्र ठोंबे, ग्रामपंचायत सदस्य भगवान ठोंबे, जायदा देशमुख, जयश्री चेमटे, लैला देशमुख, रेश्मा देशमुख, भारती चेमटे, अलका चेमटे, शकीला शेख, सानिया देशमुख, राजू शेख, समीर देशमुख, रियाज शेख, अलीम देशमुख, फिरोज देशमुख, संदीप ठोंबे, विजय मिसाळ आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
नगर तालुक्यात काही हॉटेलवर अवैध दारू विक्री सुरू असून तसेच चोरीछुपे अनेक लॉजवर अवैध धंदे सुरू आहेत याकडे पोलिसांनी लक्ष देणे गरजेचे असून नगर तालुक्यातील अनेक लॉज हे अडबाजूला असूनही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी असते याचे कोडे अद्यापही उलगडले नाही.