Homeजिल्हानगर तालुक्याची राष्ट्रावादीची धुरा रोहिदास कर्डिले यांच्याकडे नगर तालुक्याला पाहायला मिळणार कर्डिले...

नगर तालुक्याची राष्ट्रावादीची धुरा रोहिदास कर्डिले यांच्याकडे नगर तालुक्याला पाहायला मिळणार कर्डिले विरुद्ध कर्डिले नवा राजकीय संघर्ष

advertisement

अहमदनगर दि १ मार्च

नगर तालुक्याच्या राजकारण आता एक नवीन वळणावर आले असून नगर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुका अध्यक्ष पदी रोहिदास कर्डीले यांची निवड आज करण्यात आली जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी आज नियुक्ती पत्र देऊन या नियुक्ती जाहीर केली आहे.

यावेळी प्रदेश उपाध्यक्ष घन:शाम शेलार, युवक जिल्हाध्यक्ष कपिल पवार, युवक कार्याध्यक्ष संजय कोळगे, किसनराव लोटके, अंबादास गारुडकर, सिताराम काकडे, प्रकाश पोटे, बाळासाहेब जगताप, आदीसह पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

ज्या नगर तालुका अध्यक्ष पदाची धुरा  रोहीदास कर्डिले यांनी सांभाळल्या नंतर त्यांना सर्वप्रथम विरोध करावा लागणार आहे तो त्यांच्या काकांचा म्हणजे भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्यासमोरच त्यांना विरोधी नेता म्हणून उभे राहावे लागणार आहे. नगर तालुक्याची परिस्थिती सध्या पहिली तर शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले असा सामना निवडणुकीदरम्यान रंगलेला असतो. जिल्हा परिषद, नगर तालुका पंचायत समिती व नगर तालुका बाजार समितीची निवडणूक जवळ आली आहे. नगर तालुक्यात बाजार समिती भाजपचे नेते माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांची मोठी राजकीय ताकद आहे. कर्डिले हे मुरब्बी ग्रामीण पद्धतीचे राजकारण करण्यात राज्यात मातब्बर समजले जातात. तसेच रोहिदास कर्डिले हे सुद्धा माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांच्या तालमीत तयार झालेले आहेत त्यामुळे आता गुरु शिष्या बरोबरच काका पुतण्याची लढाई नगर तालुक्याला राजकारणात पाहायला मिळणार आहे.

किंगमेकरची भूमिका निभावणारे भाजपचे नेते शिवाजी कर्डिले यांची ओळख असून २०१९ निवडणुकीत राष्ट्रवादीच्या प्राजक्त तनपुरे यांनी कर्डिलेंचा 22 हजार मतांनी पराभव केला होता त्यांचा राजकीय प्रवास राष्ट्रवादी मधून भाजपमध्ये झाला असल्याने शिवाजी कर्डिले यांचे भाजप आणि राष्ट्रवादी मध्ये चांगले जवळचे मित्र आहेत तर अहमदनगर शहराचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप हे शिवाजी कर्डिले यांचे जावई आहेत.

अहमदनगर जिल्हा परिषदे मध्ये मागील निवडणुकीत ७२ जागांपैकी काँग्रेस- 23,राष्ट्रवादी- 18,भाजप -14,शिवसेना – 7,क्रांतिकारी शेतकरी पक्ष – 5,शेतकरी विकास मंडळ – 1,भाकप – 1,महाआघाडी – 2,जनशक्ती – 1 असे पक्षीय बलाबल होते नगर तालुक्‍यात आमदार शिवाजी कर्डींले यांना धक्का देत शिवसेनेने तीन, कॉंग्रेसने दोन व एक जागा राष्ट्रवादीने मिळवली होती आता रोहिदास कर्डीले यांच्या समोर नगर तालुक्यात जागा वाढवण्या बरोबर राष्ट्रवादीची संघटनात्मक ताकत वाढवण्याचे आव्हान आहे.

बाजार समिती मध्ये माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांचीच सत्ता आहे त्यामुळे आता बाजार समिती, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये नगर तालुक्यात राष्ट्रवादीची ताकद दाखवण्याची संधी रोहिदास कर्डीले यांना मिळाली असून आता काका पुतण्याच्या या निवडणुकीच्या रणांगणात कोण कोणाला धोबीपछाड देतं हेच नगर तालुक्याला पाहायला मिळणार आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular

06:40