Homeराजकारणनाताळ सणाच्या पार्श्वभूमीवर नगरसेविका शोभाताई बोरकर यांची तारकपूर प्रकाशपूर भागाला अनोखी भेट.

नाताळ सणाच्या पार्श्वभूमीवर नगरसेविका शोभाताई बोरकर यांची तारकपूर प्रकाशपूर भागाला अनोखी भेट.

advertisement

अहमदनगर दि.१७ डिसेंबर
नाताळाच्या निमित्त प्रभाग क्रमांक चार मधील प्रकाश कोर भागातील नागरिकांना नगरसेविका शोभा ताई बोरकर यांच्या माध्यमातून अनोखी भेट मिळाली आहे. सध्या अहमदनगर शहरामध्ये महानगरपालिकेच्या वतीने स्मार्ट एलईडी दिवे बक्सवण्याची मोहीम राबवली जात आहे. प्रकाशपूर भागामध्ये बहुसंख्य खिस्ती बांधव राहतात आणि नाताळनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते बहुतेक कार्यक्रम सार्वजनिक असल्याने नागरीक रात्री बाहेर पडत असतात काही ठिकाणी दिव्यांची कमतरता असल्याने अंधाराचे साम्राज्य होते. ही अडचण लक्षात घेऊन नाताळाच्या आधीच तारापूर आणि प्रकाशपूर प्रभागात नगरसेविका शोभाताई बोरकर यांच्या माध्यमातून स्मार्ट एलईडी दिवे बसवण्याच्या कामास प्रारंभ करण्यात आला आहे.

नाताळ आधीच दिव्यांची भेट देऊन प्रकाशपूर प्रकाशमय होणार असल्याने या भागातील नागरिकांनी शोभाताई बोरकर यांचे आभार मानले आहेत. शुक्रवारी दुपारपासून या कामास प्रारंभ करण्यात आला होता. माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर, सामाजिक कार्यकर्ते चिंटू शेठ गंभीर आणि प्रभागातील सर्व नागरिक उपस्थित होते.

 

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular