जामखेड दि.१९ सप्टेंबर-(प्रतिनिधी नासीर पठाण सह अशोक निमोणकर)
तालुक्यातील नान्नज या गावातील बालाजी मेडिकल या औषध दुकानासह इतरत्र आपण मेडिकल चालकाच्या मदतीने सहा बॉम्ब ठेवले असुन या बॉम्बचा काही वेळातच स्फोट होऊ शकतो असा फोन मुख्य पोलीस नियंत्रण कक्ष मंबई यांना एका अज्ञात व्यक्तीने केला आणि मुंबई पोलीसांनी याबाबत माहिती जामखेड पोलिसांना दिली मग काय पोलीसांची एकच धावपळ उडाली. अहमदनगर येथून बॉम्ब शोधक पथक व श्वानाने तपासणी केली पण ती अफवा निघाली. सदर माथेफिरूचा शोध पोलीसांनी घेतला असता तो सायको निघालो त्याच्यावर जामखेड पोलिसात १० सप्टेंबर रोजी विनयभंगचा गुन्हा दाखल आहे.
याबाबत जामखेड पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, तालुक्यातील नान्नज या गजबजाटीच्या गावातील बालाजी मेडीकल या मेडिकल दुकानासह इतरत्र गावातील काही ठिकाणी सहा बॉम्ब ठेवले आहेत अशा माहीतीचा फोन मुख्य पोलीस नियंत्रण कक्ष मुबई शाखेस एका व्यक्तीने केल्याने पोलीसाची मोठी तारांबळ उडाली होती.
या संदर्भात अहमदनगर नियंत्रण कक्षास कळवले मग श्वान पथकासह बॉम्ब शोध पथकाने धावपळ करत नान्नज हे घटनास्थळ गाठले आणी घडले ते नवलच दिनेश सुतार (पत्ता माहीत नाही) या व्यक्ती विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असुन या बाबत पोलिसांन कडून मिळालेली माहिती अशी की दि १८ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास नान्नज तालुका जामखेड, जिल्हा अहमदनगर. या गावामध्ये सहा बॉम्ब ठेवले आहेत व त्यास नान्नज येथिल एका मेडिकल वाल्याने मला मदत केली आहे असा एक फोन मुख्य नियंत्रण कक्ष मंबई यांना आल्याने त्यांनी अहमदनगर जिल्हा शाखेस कळवुन पथक रवाना हि केले पण शोध होईपर्यत मात्र या घटनेमुळे परीसरात एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी घटनास्थळ परिसराची तपासणी केली, तेव्हा बॉम्बसदृश कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नसल्याने ही अफवा असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले आणि त्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. बॉम्ब ठेवल्याची धमकी देणाऱ्या आरोपीचा पोलिसांकडून शोध चालु असुन सदर इसम हा सांगली जिल्ह्य़ातील एका खेडेगावातीत आसल्याचे समजते आहे या प्रकरणी जामखेड पोलीस स्टेशन अंतर्गत पालीस दुरक्षेत्र नान्नज चे इनचार्ज सहायक फौजदार शिवाजी भोस यांच्या फिर्यादीवरून आरोपी दिनेश सुतार यांच्या विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई अनिलराव भारती हे करत आसुन सध्या आरोपी फरार आहे.