Homeक्राईमनाशिक जिल्ह्यातील आडगाव येथील ज्वेलर्स दुकानावरील दरोड्याच्या वेळी पोलीस पथकावर फायर करुन...

नाशिक जिल्ह्यातील आडगाव येथील ज्वेलर्स दुकानावरील दरोड्याच्या वेळी पोलीस पथकावर फायर करुन जखमी अवस्थेत फरार झालेला, तसेच अहमदनगर जिल्ह्यातुन तीन गंभीर गुन्ह्यातील फरार असलेला सराईत आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

advertisement

अहमदनगर दि.१०

चित्रपटाला शोभेल असे कृत्य करत नाशिक मध्ये दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असताना पोलीस आल्याने पोलिसांवर गोळीबार करत पोलिसांच्या प्रतिउत्तरात गोळी लागूनही फरार झालेला आरोपी थेट नगर शहरात येऊन कटवन खंडोबा परीसरातील संजय नगर मध्ये नाव बदलून राहत असलेल्या सुनिलसिंग जितसिंग जुनी याला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे.स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या सह पीएसआय सोपान गोरे, सहह्याक फौजदार राजेंद्र वाघ, सफौ.विजय खंडागळे, पोहेकॉ.बापु फोलाने, पोना.भिमराज खर्से,पोना.देवेंद्र शेलार यांनी ही कामगिरी बजवली आहे.या आरोपीवर नाशिक,बीड,अहमदनगर,अकोले,या ठिकाणी गंभीर गुन्हे दाखल असून अनेक गुन्ह्यांमध्ये तो फरार होता

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular